Coronavirus Cases Today: देशात 24 तासात 3 लाख नवे रुग्ण; 491 मृत्यू
Coronavirus Cases Today: देशात 24 तासात 3 लाख नवे रुग्ण; 491 मृत्यू Saam Tv
देश विदेश

Coronavirus Cases Today: देशात 24 तासात 3 लाख नवे रुग्ण; 491 मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: देशात (India) परत एकदा कोरोना (Corona) रुग्णांची विक्रमी नोंद झाली आहे. बुधवारी दिवसभरामध्ये ३ लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. मागील २४ तासामध्ये ३ लाख १७ हजार ५३२ रुग्ण सापडले आहेत. देशात मागील वर्षी १५ मे रोजी ३ लाखांहून जास्त रुग्णांची नोंद झाली होती. तिसऱ्या लाटेत २९ डिसेंबरला १० हजार रुग्ण सापडले होते. त्यानंतर फक्त २३ दिवसामधेच रुग्णसंख्या ३ लाखांवर येऊन पोहोचली आहे. मागील वर्षी एका दिवसात ३ लाख रुग्णांची नोंद ६० दिवसांनी झाली होती.

हे देखील पहा-

मागील २४ तासात देशात २ लाख २३ हजार ९९० जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या देशामध्ये १९ लाख २४ हजार ५१ जण कोरोनावर उपचार घेत आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट हा १६.४१ टक्के इतका आहे. तर ओमिक्रॉन (Omicron) रुग्णांची संख्या ९ हजार २८७ इतकी आहे. कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत ओमिक्रॉन संख्येत ३.६३ टक्के इतकी वाढ झाली.

बुधवारी दिवसभरामध्ये देशात ४९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मंगळवारी ३५७ जणांनी प्राण गमावले होते. देशामध्ये कोरोना चाचण्या तातडीने वाढवण्याचे आदेश केंद्राने राज्यांना दिले आहेत. आतापर्यंत देशात ७० कोटी ९३ लाख ५६ हजार ८३० टेस्ट झाल्या आहेत. तर बुधवारी दिवसभरात १९ लाख ३५ हजार १८० चाचण्या झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. जानेवारीत भारत आणि अमेरिके शिवाय अर्जेंटिना हा एकमेव देश होता ज्या ठिकाणी एका दिवसात १ लाख रुग्ण आढळले होते. अमेरिका, रशिया, कॅनडा, मेक्सिको आणि पॉलंड या देशांच्या तुलनेत भारत देशाचा मृत्यूदर कमी आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : शरद पवार नाशिकला पोहोचले, हेलीकॉप्टरने आगमन

IPL 2024 Playoffs Prediction: लिहून घ्या! हेच ४ संघ करणार IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश

Weight Loss Tips: खाण्यापिण्याच्या 'या' सवयी पाळा, आठवडाभरात वजन होईल कमी

Char Dham Yatra 2024: चारधामला जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॉफिक जाम; ६ भाविकांचा मृत्यू

12th CBSE Results: धक्कादायक! निकाल जाहीर झाल्यानंतर १२ वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, इंदुरमधील घटना

SCROLL FOR NEXT