Viral Video
Viral Video Saam Tv
देश विदेश

Viral Video : मेडिकलमध्ये ORS घ्यायला गेला अन्..., हृदय पिळवटून टाकणारा Video व्हायरल

Shivani Tichkule

Viral Video : गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराच्या झटक्याने नागरिकांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. असाचं काहीसा प्रकार फरिदाबाद येथे घडला आहे. फरिदाबाद येथील एका मेडिकल स्टोअरमध्ये ओआरएस घेण्यासाठी गेलेल्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मेडिकलच्या दुकानासमोर दुर्देवी मृत्यू झाला आहे.

ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. या तरुणाची तब्येत बिघडली होती. त्यामुळे तो मेडिकल स्टोअरमध्ये ओआरएस घेण्यासाठी गेला होता. मात्र तो ओआरएस घेऊन घरी जाणारच तितक्यात अचानक तो बेशुद्ध पडला. तो पडताना मेडिकल शॉपच्या चालकाने त्याचा हात धरण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. नंतर त्या तरुणाचा मृत्यू झाला.

दुकानदारने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी या तरुणाला प्रचंड त्रास होत आहे. कारण, तो मेडिकलमध्ये गेला असता, सतत छातीवर हात ठेवताना आणि मेडिकलच्या काऊंटवर डोके टेकवताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव संजय असे आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील रहिवासी आहे. दरम्यान, काही लोकांनी मेडिकल दुकान चालवणाऱ्या व्यक्तीवर चुकीचे औषध दिल्याचा आरोप केला. पण नंतर व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण घटना स्पष्ट झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakhi Sawant Hospitalized: राखी सावंतची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये दाखल

DC vs LSG : अभिषेक पोरेल आणि शे होप यांची तुफान फटकेबाजी; दिल्लीचं लखनऊसमोर २०९ धावांचं आव्हान

Mumbai News: मुंबईकरांचं मरण, होर्डिंगवरून राजकारण; भुजबळ ठाकरेंच्या पाठीशी, भाजप पडले तोंडघशी

Today's Marathi News Live : कल्याण लोकसभा मतदारसंघात अखिल भारतीय सेनेचा महायुतीला जाहीर पाठिंबा

Perfect जोडीदार कसा निवडायचा?

SCROLL FOR NEXT