Delhi Viral News Saam Tv
देश विदेश

Delhi Viral News : भावाच्या लग्नात नाचताना 19 वर्षीय मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Heart Attack : चुलत भावाच्या लग्न समारंभात नाचत असताना एका तरुणाचा मृत्यू झाला.

Shivani Tichkule

Delhi News Update : गेल्या काही महिन्यांपासून देशात हृदयविकाराच्या झटक्याने अनेकाचे मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यासंदर्भातील अनेक धडकी भरवणारे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये कुणाचा नाचताना, कुणाचा दांडिया खेळताना, तर कुणाला भर मंडपात हार्ट अटॅक आल्याच्या घटना घडल्या आहेत. तरुणांपासून ते वृद्धापर्यंत कुणालाही हार्ट अटॅक येताना दिसत आहे. (Latest Marathi News)

आता अशीच काहीशी घटना दिल्लीतील (Delhi) समयपूर बदली येथून समोर आली आहे. चुलत भावाच्या लग्न समारंभात नाचत असताना एका तरुणाचा मृत्यू झाला. आकाश असं त्याचं नाव असून तो केवळ 19 वर्षांचा होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार तो खूप आनंदी होता. तो नाचत होता, त्याच दरम्यान तो अचानक खाली पडला.त्यानंतर त्याच्या पालकांनी त्याला रुग्णालयात नेलं. मात्र काही उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी (Doctor) त्याला मृत घोषित केलं. या घटनेनं एकच खळबळ उडाली.

सुरुवातीला तिथे उपस्थित लोकांना काहीच समजले नाही. कदाचित तो तरुण तसाच बेशुद्ध झाला असावा असे त्यांना वाटले. त्यांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा खूप प्रयत्न केला, तो उठला नाही तेव्हा त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

त्याचवेळी, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा. आकाशला कोणताही आजार नसल्याचे त्याचे नातेवाईक सांगतात. त्याला कधीच हृदयाचा त्रास आहे असे वाटले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच तरुणाच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. लग्नात नाचताना हसत्या खेळत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची ही पहिली घटना नाही. अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT