Heart Attack Death Case Saam TV
देश विदेश

Heart Attack Case: डीजेच्या तालावर नाचताना अचानक कोसळला; अवघ्या १० सेकंदातच तरुणाचा गेला जीव, दुर्देवी घटना!

Heart Attack Death Case: डीजेच्या तालावर नाचताना सुमितला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Satish Daud

Heart Attack Death Case

मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणाला अचानक अस्वस्थ वाटू लागले. डीजेच्या तालावर नाचता-नाचता तो धाडकन जमिनीवर कोसळला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर मित्रांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कोतवाली जिल्ह्यातल्या हनौता गावात घडली. सुमित सिंग (वय १८ वर्ष, रा. पाबसरा) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. डीजेच्या तालावर नाचताना सुमितला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

या घटनेमुळे वाढदिवसाच्या पार्टीत भयान शांतता पसरली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुमितच्या मृत्युची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली. पोटच्या मुलाचा मृत्यू झाल्याने सुमितच्या आईने रुग्णालयात आक्रोश केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली परिसरातील पाबसरा गावातील रहिवासी असलेल्या लक्ष्मण सिंग यांचा मुलगा सुमित सिंग हा मंगळवारी रात्री मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हनौता गावात गेला होता. रात्री पार्टी केल्यानंतर सर्व मित्र डीजेच्या तालावर डान्स करीत होते.

यावेळी सुमित देखील डान्स करत होता. मात्र, डान्स करता-करता त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि क्षणार्धात तो जमिनीवर धाडकन कोसळला. तिथे उपस्थित असलेल्या मित्रांनी सुमितला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

दरम्यान, हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने सुमितचा मृत्यू झाला, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. बऱ्याच वेळा डीजेवर नाचनात नाडीचा वेग वाढतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. तरुणांनी काळजी घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जगाची धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार; होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेने इराणची ३१ जहाजे रोखली

Maharashtra News Live Update: पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या दरम्यान राडा; मुर्शिदाबादमध्ये हुमायूं कबीर यांच्या विरोधात घोषणाबाजी

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, नाशिकमधील प्रसिद्ध डॉक्टरचं नाव समोर; गर्भपातासाठी करायचा मदत

Coconut Water Vs Cucumber Water: नारळ पाणी की काकडीचे पाणी? उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी कोणतं ड्रिंक बेस्ट?

Ready To Wear Blouse Designs : शिलाईचे झंझट नको गं बाई! उन्हाळ्यात साडीवर स्टाइल करा 'हे' ५ रेडी-टू-वेअर ब्लाउज

SCROLL FOR NEXT