Crime News Saam Tv
देश विदेश

Crime News: पुजारी अन् दोन तरूणांकडून सामुहिक बलात्कार, पीडितेने वंदे भारतसमोर उडी घेत संपवलं आयुष्य; वडिलांचा आक्रोश

Vande Bharat train incident: एका १७ वर्षीय विद्यार्थीनीनं वंदे भारत ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Bhagyashree Kamble

एका १७ वर्षीय विद्यार्थीनीनं वंदे भारत ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. विद्यार्थीनीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मुलीवर एका पुजारी आणि गावातील २ तरूणांनी लैंगिक अत्याचार केला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय. याच कारणामुळे तिनं ट्रेनसमोर उडी घेत आयुष्य संपवल्याची माहिती आहे. ही धक्कादायक घटना हरियाणाच्या सोनीपतमध्ये घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत मुलीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटलं की, त्यांची मुलगी इयत्ता बारावीत शिकत होती. गेल्या अनेक दिवसांपासून गावातील २ तरूण तुषार आणि कमल मुलीला त्यांच्या जाळ्यात अडकवण्याच्या प्रयत्नात होते. मुलीनं यासंदर्भात आधीही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ४ मार्चला तुषार आणि कमल यांनी त्यांच्या मुलीला आमिष दाखवून गावातील मंदिरात पुजारी मनजीतकडे नेले होते.

५ मार्चला मनजीत यानं मृत मुलीच्या वडिलांना फोन करून सांगितले की, तुमच्या मुलीनं ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. तिन्ही आरोपींनी मुलीवर बलात्कार केल्याचा संशय मुलीच्या वडिलांना आहे. ज्यामुळे तिने ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. यानंतर मृत मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तिघांवर केला गुन्हा दाखल

जीआरपी स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक महाबीर तोमर यांनी सांगितले की, मृत मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार आणि त्यांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार, जीआरपी पोलीस स्टेशनने तुषार, कमल आणि मनजीत यांच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कारवाई करत पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT