Heart Attack Saam Tv News
देश विदेश

Heart Attack: दहावीच्या विद्यार्थीनीचा हार्टअ‍ॅटकनं मृत्यू, शाळेच्या गेटवरच प्राण सोडले

Telangana Student Heart Attack: दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेबाहेरच हार्टअ‍ॅटकमुळे मृत्यू झालाय. या घटनेनंतर परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Bhagyashree Kamble

दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेबाहेरच हार्टअॅटकनं मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना कामारेड्डी जिल्ह्यात गुरूवारी सकाळच्या सुमारास घडली. शाळेत चालत जात असताना तिला हार्टअॅटक आल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या १६ व्या वर्षात हार्ट अॅटकमुळे मृत्यू झाल्यानंतर परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

दहावीत शिकणाऱ्या श्रीनिधी हिचा हार्ट अॅटकमुळे मृत्यू झाला आहे. तेलंगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यातील एका गावात ती राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिधी ही सकाळी शाळेत जात होती. शाळेत जात असताना तिच्या अचानक छातीत दुखू लागलं. तिला थोडावेळ अस्वस्थ वाटू लागलं. छातीत कळ आल्यानंतर ती क्षणात खाली कोसळली.

खाली कोसळल्यानंतर शाळेतील एका शिक्षकाने तिला पाहिलं. तिला ताबडतोब रूग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि प्राथमिक उपचार दिले. परंतू तिने प्रतिसाद न दिल्यामुळे तिला दुसऱ्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. दुसऱ्या रूग्णालयात श्रीनिधीचा हार्टअॅटकनं मृत्यू झाल्याचं घोषीत केलं.

श्रीनिधीचा मृत्यू झाल्यानंतर परिसरातील अनेकांना धक्काच बसला. श्रीनिधीसारख्या लहान मुलीचे ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्यानं अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच शाळेतील आणि विद्यार्थ्यांनी श्रीनिधीच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ideal Weight by Age: तुमचं वजन योग्य आहे का? १८ ते ६० वयापर्यंत वयानुसार जाणून घ्या किती असावे वजन

Maharashtra News Live Update: गणेश मंडळ आणि महापालिकेच्या बैठकीत गोंधळ

IAS Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे पोस्टिंग?

Skin Care : सणांच्या घाईत त्वचेसोबत 'ही' चूक होत नाही ना? नॅचरल ग्लो हवा असेल, तर आजपासूनच करा हे ५ बदल

Private Part Hygiene Tips: प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका! ‘या’ ५ गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या

SCROLL FOR NEXT