Breaking news  saam tv
देश विदेश

Army Truck Accident: भारतीय लष्कराच्या गाडीला भीषण अपघात, 16 जवान शहीद

घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Army Truck Accident: सिक्कीममध्ये भारतीय लष्कराच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 16 भारतीय जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. (Indian Army)

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. नॉर्थ सिक्कीममध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांच्या जीवितहानीमुळे खूप दुःख झाले आहे. (Latest Marathi News)

जवानांच्या सेवेबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल देश मनापासून कृतज्ञ आहे. शोकग्रस्त कुटुंबियांना माझ्या संवेदना. जखमी जवान लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो, असं संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं.

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, 23 डिसेंबर 2022 रोजी उत्तर सिक्कीममधील जेमा येथे लष्कराच्या ट्रकला अपघात झाला. या भीषण रस्ते अपघातात भारतीय लष्कराच्या 16 जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अपघातग्रस्त वाहन तीन वाहनांच्या ताफ्याचा भाग होता, जे सकाळी चतनहून थंगूच्या दिशेने निघाले होते. दरम्यान एका तीव्र वळणावर ट्रकला भीषण अपघात झाला. अपघातानंतर तात्काळ बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. चार जखमी जवानांना विमानाने हलवण्यात आले आहे. दुर्दैवाने, या दुर्घटनेत तीन अधिकारी आणि 13 सैनिकांना आपला जीव गमवावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT