crime Saam tv
देश विदेश

Crime News: मोबाईल पाहू नकोस, आई मुलीला ओरडली; रागाच्या भरात थेट २० व्या मजल्यावरून मारली उडी

Parent-child conflict mobile usage: दहावीत शिकणाऱ्या मुलीने २० व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. परीक्षेदरम्यान आईने मोबाईल फोन वापरण्यास मनाई केल्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचललं.

Bhagyashree Kamble

दहावीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलीनं २० व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. परीक्षेदरम्यान आईने मोबाईल फोन वापरण्यास मनाई केल्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले आहे. ही धक्कादायक घटना बेंगळुरूमधील कडूगोडी पोलीस स्टेशन परिसरात घँडली आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

अवंतिका चौरसिया ही १५ वर्षांची मुलगी होती. ती व्हाईटफील्ड परिसरातील सीबीएसई शाळेत शिकत होती. अवंतिकाचं हे दहावीचं वर्ष होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारीपासून वार्षिक परीक्षा सुरू होणार होत्या. त्यामुळे अवंतिकाच्या आईनं तिला मोबाईल वापरण्यास मनाई केली होती. याच कारणामुळे संतापून अवंतिकाने २० व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कडूगोडी पोलीस ठाण्यात पोलिसांनी तक्रार दाखल केली. तसेच अवंतिकाच्या आई वडिलांचा जबाब नोंदवून घेतला. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

या प्रकरणी कडूगोडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी म्हणाले, ही घटना अत्यंत दु:खद आहे. मुलांवरील अभ्यासाचा दबाव आणि मोबाईल फोनच्या क्रेझमुळे मानसिक स्थिती काही मुलांची मानसिक स्थिती बिघडत चालली आहे. त्यामुळे पालकांनी मुलांसोबत प्रेमाने बोलावे. मुलांना समजावून गोष्टी सांगा. मुलांच्या मनावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असल्याचंही पोलीस अधिकारी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT