गोव्याच्या पत्रादेवी चेक नाक्यावर 12 लाख 14 हजारांची दारू जप्त अनिल पाटील
देश विदेश

गोव्याच्या पत्रादेवी चेक नाक्यावर 12 लाख 14 हजारांची दारू जप्त

गोव्याच्या पत्रादेवी चेक नाक्यावर अबकारी विभागाने 12 लाख 14 हजार 880 रुपयांची दारू जप्त केली असून ट्रक ताब्यात घेतला असून त्याची 17 लाख किंमत आहे.

अनिल पाटील

गोवा: गोव्याच्या पत्रादेवी चेक नाक्यावर अबकारी विभागाने 12 लाख 14 हजार 880 रुपयांची दारू जप्त केली असून ट्रक ताब्यात घेतला असून त्याची 17 लाख किंमत आहे. हा ट्रक गोवा मार्गे पनवेल येथे जात होता. (12 lakh 14 thousand liquor seized at Patradevi check post in Goa)

हे देखील पहा -

23 सप्टेंबर रोजी साडेसात वाजता हे वाहन पत्रादेवी अबकारी चेक नाक्यावर पोचले . त्यावेळी चालकाने आपली कागदपत्रे घेवून नाक्यावर आलाच नाही. कुठे जातो? असे विचारले तर उत्तर देऊ शकला नाही. वाहन तपासण्यात अधिकारी मग्न असताना वाहन चालक आपल्या वाहनाची चावी घेऊन फरार झाला. वाहनात वाहनाचे परमिट असलेले नक्कल प्रत होती तर एकाचे आधार कार्ड सापडले आहे. अबकारी अधिकाऱ्यांना संशय आल्यावर तपासणी केली असता बियरच्या 330 बॉक्स शिवाय विदेशी बनावटीची दारू होती ती जप्त केली आहे. MH16-CC-8200 हे क्रमांकाचे वाहन जप्त केले आहे.

या कारवाईत पोलिस निरीक्षक अमोल हरवळकर, दिलीप तिळवे, निलेश गावडे, शंकर पर्येंकर, देविदास नाईक, विठोबा मालवणकर व सतीश तिळवे आदींनी भाग घेतला. कोरोना काळातील ही चौथी मोठी कारवाई आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC उमेदवारांसाठी मोठी अपडेट! 'ही' परीक्षा झाली रद्द; पहा आयोगाचा अधिकृत निर्णय

Maratha reservation : मराठा समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'या' प्रलंबित मागण्यांवर मोहर; त्वरित मिळणार लाभ

Wednesday Horoscope : गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल, वाणीवर लक्ष असू द्या; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : खात्यात इतक्या रूपयांचा हप्ता आला की नाही? लाडक्या बहिणींसाठी मोठे सरप्राईज; आताच बॅलेन्स करा चेक

Mumbai Ganeshotsav: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक

SCROLL FOR NEXT