Railway Updates in Marathi, Todays Cancelled Trains Saam Tv
देश विदेश

यात्रीगण कृपया ध्यान दे! रेल्वेने रद्द केल्यात 101 ट्रेन; प्रवास करण्यापूर्वी रद्द गाड्यांची यादी तपासा

तुम्ही जर आज कुठे प्रवास करत असणार तर प्रवास करण्यापूर्वी रद्द गाड्यांची यादी तपासा.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - भारतीय रेल्वे हा देशातील सामान्य लोकांच्या जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग मानला जातो. भारतीय रेल्वेच्या (Railway) दररोज हजारो गाड्या धावतात आणि करोडो लोकांना त्यांच्या घरी पोहोचवतात. दररोज हजारो प्रवासी आपल्या घरी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. अशा स्थितीत रेल्वे ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानली जाते. अशा परिस्थितीत तुम्ही कुठे प्रवासासाठी जात असाल आणि ट्रेन रद्द झाली असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो. तुम्ही जर आज कुठे प्रवास करत असणार तर प्रवास करण्यापूर्वी रद्द गाड्यांची यादी तपासा. (Railway News Updates in Marathi)

हे देखील पाहा -

रेल्वेवर मोठ्या प्रमाणात लोकांचे अवलंबित्व पाहता, प्रवाशांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचाही प्रयत्न केला जातो, परंतु अनेकवेळा वेगवेगळ्या कारणांमुळे रेल्वेला गाड्या रद्द कराव्या लागतात, वेळापत्रकात बदल करावे लागतात. त्याचवेळी रेल्वे रुळांच्या दुरुस्तीमुळे रेल्वे रद्द होतात.रेल्वेकडून दररोज हजारो गाड्या चालवल्या जातात. अशा परिस्थितीत, त्यांची योग्य देखभाल आणि ट्रॅकची दुरुस्ती करणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत रेल्वे गाड्या रद्द करते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते.

रेल्वेने 100 हून अधिक गाड्या रद्द केल्या, अनेक गाड्या वळवल्या

1 जुलै 2022 रोजी रेल्वेने एकूण 101 गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, एकूण 21 गाड्या वळवण्यात आल्या असून 11 गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

रद्द, वेळापत्रक आणि वळवलेल्या गाड्यांची यादी कशी पहावी-

रद्द केलेल्या गाड्यांची यादी तपासण्यासाठी enquiry.indianrail.gov.in/mntes/ या वेबसाइटला भेट द्या.

Exceptional Trains हा पर्याय दिसेल. हा पर्याय निवडा

रद्द, पुनर्निर्धारित आणि वळवलेल्या गाड्यांच्या यादीवर क्लिक करा.

हे तपासूनच घराबाहेर पडा नाहीतर तुम्हाला नंतर त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime : लग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार! ८ जणांवर चाकूने सपासप वार, तिघांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update : . भुसावळ शहरात आज श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

Raja Shivaji: हातात भगवा, नजरेत ज्वाला…; शिवजयंतीनिमित्त रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची दमदार झलक समोर

Kolhapur News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अश्लील डान्स|Video Viral

Mumbai Local News : रेल्वे प्रवाशांना लागणार शिस्त; अपघाताचं प्रमाण होणार कमी, काय आहे रेल्वे प्रशासनाचा नवा उपक्रम?

SCROLL FOR NEXT