Mumbai Crime News  saam tv
देश विदेश

Assam News : भाजप खासदाराच्या घरात आढळला १० वर्षीय मुलाचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरु

Dead body found in BJP MP house : मुलाचे नाव देखील राजदीप रॉय असल्याची माहिती समोर येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Asaam News :

आसाममध्ये भाजप खासदार राजदीप रॉय यांच्या घरात १० वर्षीय मुलाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी सिलचल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. मुलाचे नाव देखील राजदीप रॉय असल्याची माहिती समोर येत आहे.

मुलाच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की ते कचार जिल्ह्यातील पलोंग घाट भागातील रहिवासी आहेत. मुलाची आई भाजप खासदार रॉय यांच्या घरी घरकाम करते. ही महिला काही वर्षांपूर्वी तिच्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी सिलचरला आली होती. (Latest Marathi News)

घटनेची माहिती मिळताच भाजप खासदार राजदीप रॉय त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी मीडियाला सांगितले की, ज्या खोलीत मुलाचा मृतदेह सापडला ती खोली आतून बंद आहे. पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा मुलगा बेशुद्ध पडला होता. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (Political News)

प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. व्हिडीओ गेम खेळण्यासाठी तो फोन मागत होता. तो न मिळाल्याने त्याच्या आईवर रागावल्याचे कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले आहे.

मुलगा अत्यंत अभ्यासात खूप हुशार होता. हस्ताक्षर पाहिले आणि काही वेळ त्याच्याशी बोललो होतो. मुलाचा मृत्यू माझे वैयक्तिक नुकसान आहे आणि माझ्या कुटुंबाला धक्का बसला आहे, असं खासदार राजदीप रॉय यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aleovera Benefits : तुमचेही केस तेलकट अन् चिकट होतात का? 'हा' घरगुती उपाय करून मिळवा सिल्की केस

CJP Protest: दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ दादरमध्ये आंदोलन, आदित्य आणि अमित ठाकरेंनी घेतली आंदोलकांची भेट| VIDEO

Poladpur Tourism : कोकणातील हे लपलेलं निसर्गरत्न! पावसाळ्यात पुन्हा सजला मोरझोत धबधबा

Drink Water : दररोज सकाळी २ ग्लास पाणी का प्यावं? वाचा चमत्कारिक फायदे

Devgad Waterfall : पाऊस, कोकण अन् धो धो कोसळणारा धबधबा, देवगडजवळ लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

SCROLL FOR NEXT