ulhasnagar , police, arrests, youth  Saam Tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar : किरकाेळ कारणावरुन उल्हासनगरातील इमली पाड्यात युवकाची हत्या

पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

अजय दुधाणे

Ulhasnagar : उल्हासनगर (Ulhasnagar) येथे किरकाेळ कारणावरुन एकमेकाचा धक्का लागल्यावरून वाद झाला आणि या वादात एकाचा खून झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.या प्रकरणाचा मध्यवर्ती पोलिस (police) तपास करीत आहेत. (Ulhasnagar Latest Marathi News)

मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत इमली पाडा येथून दोन मद्यधुंद नागरिक जात असताना त्यांचा एकमेकाला धक्का लागला. यावरून सुरू झालेल्या वादात अजय उर्फ अज्जू विजय चव्हाण याने निरंजन यास एक दांडका पोटात मारला. (Maharashtra News)

हा दांडका निरंजन याला लागताच तो खाली कोसळला. अजय चव्हाण याने तिथून पळ काढला. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या निरंजन याला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारार्थ नेले असता तेथे डॉक्टरांनी निरंजन यास मृत घोषित केले. याप्रकरणी लागलीच मध्यवर्ती पोलिसांनी अजय चव्हाण याला उल्हासनगर स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील कर्मचारी तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्राच्या अर्जाची माहिती आता थेट SMSवर

Maharashtra News Live Update: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील मराठा बांधव उतरले रस्त्यावर

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गानं लाज आणली, उदघटानाला जाण्यास गडकरींचा नकार

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! बड्या ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुठे कोणाची नियुक्ती? वाचा

Shivali Parab: शिवाली परबचा नवा ग्लॅमरस लूक; सिल्व्हर बॅकलेस गाऊनमध्ये कल्याणच्या चुलबुलीचा जलवा

SCROLL FOR NEXT