Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Vadapav: ५ रुपयांवरुन नगरच्या युवकाचा झाला खून; चाैघे पाेलीसांच्या ताब्यात

त्याला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते.

सचिन आगरवाल

नगर : वडा पावच्या (vadapav) एका दुकानावर किरकाेळ काराणावरुन झालेल्या वादावादीची रुपांतर भांडणात झाले आणि त्यातून एका युवकाचा (youth) खून झाला. प्रवीण कांबळे असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव असून त्याच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर (nagar) पाेलीसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. (nagar latest marathi news)

पाेलीसांनी दिलेली माहिती अशी : ही घटना एमआयडीसी भागातील सह्याद्री चौक परिसरात घडली. प्रवीण हा एका वडा पावच्या दुकानावर गेला होता. दुकानदाराने त्याला वडा पावचे २० रुपये मागितले. त्यावर त्याने पाच रुपये कमी करा असे म्हटले. त्यातून वादवादी झाली. त्याचे पर्यावसन भांडणात झाले.

यावेळी परिसरातील काही जणांना प्रवीणला मारहाण केली. त्याला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उपाचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. प्रवीणच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतल्याची माहिती युवराज आठरे (पोलिस निरीक्षक, एमआयडीसी) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT