molesting, police, youth, Savitribai Phule Pune University, student saam tv
मुंबई/पुणे

Pune News : 31 डिसेंबरच्या रात्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थिनीला छेडले, गुन्हा दाखल

पाेलिसांनी घटनेचा गांभीर्य लक्षात घेता युवकावर गुन्हा दाखल केला.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन जाधव

Pune Crime News : मित्रासोबत गप्पा मारत थांबलेल्या विद्यार्थिनीला अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिसांनी दीपक सौदे या संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. पाेलिस (police) या प्रकरणाचा तपास करीत आहेत. (Maharashtra News)

ही घटना 31 डिसेंबरला रात्री बाराच्या सुमारास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) अ‍ॅल्युमिनी हॉलच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावर घडली. त्याबाबतची माहिती एका संबंधित विद्यार्थिनी पाेलिसांत देत युवकाविरुद्ध (youth) तक्रार नाेंदवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवती विद्यापीठात शिक्षण घेत आहे. तिच्या मित्रासोबत ती येथील अ‍ॅल्युमिनी हॉलसमोरील सार्वजनिक रस्त्यावर 31 डिसेंबरच्या रात्री गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी संशयित आराेपी सौदे तेथे आला. त्याने युवतीला काही कारण नसताना तू कोणत्या डिपार्टमेंटची आहे, एवढ्या उशिरा काय करता, असे बोलून अश्लील शिवीगाळ केली. (Latest Marathi News)

तसेच, पोलिसाची गाडी बोलावून आतमध्ये टाकण्याची धमकी देऊन तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली त्यावरून युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे असे पाेलिसांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT