Violence at Goregaon Nesco Dandiya festival: 19-year-old youth injured, attackers escape police custody. saamtv
मुंबई/पुणे

Mumbai Dandiya: आधी धक्का दिला नंतर घेरत जमावानं तुडवलं; गोरेगाव नेस्को दांडिया महोत्सवात तरुणाला बेदम मारहाण

Goregaon Nesco Dandiya Youth Brutally Assaulted: मुंबईतील गोरेगाव नेस्को दांडिया महोत्सवात एका १९ वर्षीय तरुणावर क्रूर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्याला जखमी केल्यानंतर पोलीस व्हॅनमधून पळ काढला. पीडितेला मालाडच्या तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय.

Bharat Jadhav

  • गोरेगाव नेस्को दांडिया महोत्सवात मारहाणीची घटना घडली.

  • १९ वर्षीय जेनिल बारबया या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली.

  • हल्लेखोर पोलिसांच्या व्हॅनमधून पसार झाले.

संजय गडदे, साम प्रतिनिधी

मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्कोमध्ये झालेल्या नवरात्री दांडिया महोत्सवात मारहाणीची घटना घडलीय. एका १९ वर्षीय जेनिल बारबया नावाच्या तरुणाला काही उपद्रवी तरुणांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात जेनिल बारबयच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीय. त्याला मलाड (पश्चिम) येथील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बुधवारी रात्री झालेल्या या घटनेत पोलिसांनी तिघा तरुणांना ताब्यात घेतले होते. मात्र उपलब्ध माहितीनुसार हे आरोपी पोलिसांच्या व्हॅनमधून पसार झालेत. अधिक मिळालेल्या माहितीनुसार, नेस्को येथे पावसामुळे मोठी गर्दी झाली होती. दांडिया खेळताना एका उपद्रवी तरुणाने जेनिलला धक्का दिला, त्यावर प्रश्न विचारल्यामुळे भांडण उफाळले व जमावाने त्याला मारहाण केली असं सांगण्यत येत आहे.

नवरात्र उत्सवात दांडिया, गरबा खेळला जातो. मूळचा गुजरातचा असणारा दांडीया हा आता महाराष्ट्रातही चांगलाच रुजलाय. मात्र या दांडिया महोत्सावात काही अनुचित घटना देखील घडतात. मुंबईतील गोरेगावातील नेस्को दांडिया महोत्सवात एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण केलीय. धक्का लागल्याचं कारण विचारल्यानंतर जमावने त्याला घेरत जबर मारहाण केली. याप्रकरणी गोरेगावमधील वनराई पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आलीय. विशेष म्हणजे मारहाण करणारे काहीजण पोलीस व्हॅनमधून पसार झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे अॅक्टिव्ह नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती?

MI Coach: मुंबई इंडियन्सला मिळला नवीन कोच; 'या' अनुभवी खेळाडूवर संघाची जबाबदारी

Election Commission: मतमोजणीच्या नियमात बदल, निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय

Sambhaji Bhide: दांडिया खेळणं म्हणजे नपुंसकता; संभाजी भिडेंच्या वक्तव्याने महाराष्ट्रात पेटला वाद

Rahul Gandhi : तुम्ही घाबरु नका, काँग्रेस तुमच्या सोबत; मामा पगारेंना थेट राहुल गांधींचा फोन, VIDEO

SCROLL FOR NEXT