Viral Video| आली लहर केला कहर! मद्यधुंद अवस्थेत तरुणीचा भररस्त्यात धिंगाणा Saam Tv
मुंबई/पुणे

Viral Video| आली लहर केला कहर! मद्यधुंद अवस्थेत तरुणीचा भररस्त्यात धिंगाणा

पूण्यातील स्वारगेटच्या भागाच्या जवळ असलेल्या हिराबाग चौकात एका उच्चशिक्षित तरुणीने चक्क कहरच केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : पूण्यातील स्वारगेटच्या भागाच्या जवळ असलेल्या हिराबाग चौकात एका उच्चशिक्षित तरुणीने चक्क कहरच केला आहे. त्या तरुणीने दारू पिलेली होती. दारू पिऊन, मस्त रस्त्यावर झोपून, जोरजोरात आरडाओरड करून धिंगाणा घातल्याचा त्या तरुणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

चक्क रस्त्यावर ही तरुणी लोळत होती. बराच वेळ तिचा हा ड्रामा सुरु राहिला. येथील काही नागरिकांनी या हास्यपदप्रकरणाची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

व्हिडिओ मध्ये दिसून येतंय की, या तरुणीने रस्त्यावर झोपून गाड्या अडविण्याचा प्रयत्न ती करत आहे. या झिंगाट कृत्याची माहिती तेथील एका स्थानिक व्यक्तीने पोलिसांना कळविली आणि पोलीसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पोहोचतच त्यांनी त्या बेभान तरुणीची समजूत काढली आणि तिला रस्त्याच्या कडेला आणले.

ती मदयधुंद तरुणी रस्त्यावरुन झोपून ये जा करणाऱ्या गाड्यांना अडवत होती. यामुळे वाहनांच्या मार्गात अडथळा होत होता. या तरुणीचा गोंधळ सुरू असताना तिला पाहण्यासाठी मात्र रस्त्याच्या आजूबाजूला चांगलीच गर्दी जमली होती. यासंदर्भातील माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. तातडीने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मुलीला रस्त्यावरुन बाजूला काढले. त्यानंतर पोलिसांनी या तरुणीला अधिक चौकशीसाठी पोलीस स्थानकानकामध्ये नेऊन चौकशी केली.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT