Mumbai Viral Video Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Viral Video: लग्नाचं दिलं वचन अन् केला दगा! तरुणीचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

>> संजय गडदे

Mumbai Crime News:

मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. याप्रकरणी मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

सोशल मीडिया साईट इंस्टाग्रामवर हे फोटो अपलोड करण्यात आले होते. दिलदार खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, इंस्टाग्राम (Instagram Viral Video) या साइटवर आरोपीची तरुणीसोबत ओळख झाली हाती. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. तरुणीला विश्वासात घेऊन आरोपीने विवस्त्र अवस्थेत तरुणीला विवर व्हिडीओ कॉल (Viral Video Call) करण्यास भाग पाडले व त्याचा स्क्रीन रेकॉर्डिंग करून तो सोशल मीडियावर बोगस अकाउंट करून वायरल केला. (Latest Marathi News)

याप्रकरणी पीडित तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी दिलदार खान याला अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहे.

दरम्यान, बीडमध्येही असाच एक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका शाळेत शिक्षकांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शिक्षक आणि शिक्षिका शाळेच्या आवारातच अश्लील कृत्य करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पालिकांनी आणि शाळेच्या अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. या प्रकार घडल्यानंतर याची माहिती आधीच शाळेच्या शिपायाने अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र त्याआधीच हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीविरोधात 9 डिसेंबर रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती.x

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT