विसजर्नाच्या वेळी ओढवले विघ्न, वीजेच्या झटक्याने कल्याणमधील तरुणाचा मृत्यू! प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

गणपती विसजर्नाच्या वेळी ओढवले विघ्न, वीजेच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू!

एव्हरेस्टनगर मित्र मंडळ येथे मनाला चटका लावून जाणारी एक दु:खद घटना घडली.

प्रदीप भणगे

कल्याण : गणपती विसजर्नासाठी मूर्ती घेऊन जात असताना विजेच्या झटक्याने (electric shock) कल्याण मधील तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना कल्याणच्या एव्हरेस्टनगर परिसरात घडली असून प्रशांत चव्हाण (वय 28) असे या तरुणाचे नाव आहे. (Young man dies of electric shock)

काल अनंत चतुर्थी निमित्त राज्यासह देशभर अनेक ठिकाणी गणेश मुर्तींचे विसर्जन करत गणपत्ती बाप्पाना निरोप देण्यात आला. मात्र कल्याण पश्चिमेतील (Kalyan West) बेतुरकर पाडा येथील एव्हरेस्टनगर मित्र मंडळ येथे मनाला चटका लावून जाणारी एक दु:खद घटना घडली. एव्हरेस्टनगर मित्र मंडळाच्या गणपती विसजर्ना दिवशी या मंडळावर एकच दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काल संध्याकाळी कल्याणमध्ये जोरदार पाऊस होता. याच दरम्यान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणपती विसजर्नासाठी बाहेर काढण्यास सूरुवात केली. गणपती थोडय़ा अंतरावर गेला असता ज्या ठिकाणी गणपती बसविला होता. त्या ठिकाणचा विज पुरवठा बंद चालू होत होता. हे चेक करण्यासाठी मंडळाचा कार्यकर्ता प्रशांत चव्हाण त्याठिकाणी गेला असतानाच त्याला विजेचा जोरदार झटका बसला.

त्याला शॉक लागला आहे हे समजताच उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) घेऊन गेले मात्र त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. प्रशांतच्या मागे त्याची आई आणि त्याचा लहान भाऊ आहे. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. या घटनेचा तपास कल्याणचे महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पोलिस (Mahatma Phule Police Station) करीत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates: पोस्टल मतमोजणी संपली, सुरूवातीचे कल एनडीएच्या बाजूने

कार्तिक कृष्ण दशमी: आज सिंह राशीवर चंद्राची कृपा; पाहा कोणत्या राशींना मिळणार मोठा लाभ

Maharashtra Live News Update: पंढरपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना उस दरासाठी आक्रमक

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी अपडेट; मास्टरमाईंडचे घर उडवले, सुरक्षा दलांची कारवाई

Accident News : नवले पुलाचा उतार ठरतोय मृत्यूचा सापळा, वर्षभरातील अपघाताचा आकडा धक्कादायक, घटनेला जबाबदार कोण?

SCROLL FOR NEXT