Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यात भररस्त्यात तरुणाचा राडा, कारवर चढून फोडल्या काचा; VIDEO होतोय व्हायरल

Pune Police : या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

Pune News: पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या (Pune Crime) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. शुल्क कारणावरुन हत्या, राडा, भांडण हे सुरुच आहे. नुकताच पुण्यात एका तरुणाने भररस्त्यात राडा करत कारच्या काचा फोडल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातल्या औंध परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील औंध परिसरामध्ये शुक्रवारी रात्री एका तरुणाने भररस्त्यावर राडा केला. या तरुणाने आपल्या कारमधून उतरुन दुसऱ्या कारवर चढत त्या कारची तोडफोड केली. या कारच्या काचा फोडल्या. कारला धक्का लागल्यामुळे जाब विचारला म्हणून संतप्त होत या तरुणाने हे कृत्य केले आहे. ऐवढचं नाही तर त्याने दुसऱ्या कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला मारहाण देखील केली. तर कारचालक वकील महिलेचा विनयभंग केला.

https://sharechat.com/video/d9GVZXMz?referrer=url

या घटनेप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात या तरुणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश काटे असे या तरुणाचे नाव आहे. वाहनचालक वकील महिलेच्या तक्रारीनुसार, 'त्या शुक्रवारी रात्री जेवणाचे पार्सल आणण्यासाठी पतीसोबत जात होत्या. त्याचवेळी स्पायसर कॉलेजजवळ सतीश काटेची कार त्यांच्या कारला घासून जात होती. त्यामुळे त्यांनी सतीशच्या कारवर हाताने मारुन 'तू गाडी व्यवस्थित चालव, आमच्या गाडीला धक्का लागेल' असं सांगितलं.

'असं सांगितल्यामुळे सतीशला राग आला. त्याने त्याची कार रस्त्यामध्येच थांबवली. कारमधून खाली उतरुन त्याने मला आणि माझ्या पतीला शिवीगाळ करत विनयभंग केला. त्याने त्याच्या कारचा दरवाजा जोरात ढकलून माझ्या पतीला जखमी केले आणि आमच्या कारची पुढची काच फोडून नुकसान केले.', असं या वकील महिलेने तक्रारीत सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maternity Leave : कोणताही नियम महिलेला मातृत्व रजा घेण्यापासून रोखू शकत नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Monalisa Wedding : मोनालिसानं फरमानसोबत पळून जाऊन केलं लग्न, कुंभमेळ्यामुळे रातोरात झाली होती प्रसिद्ध

Grapes Cleaning: तुम्ही द्राक्षे धुवून लगेच खाताय का? व्यवस्थित स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक

Maharashtra Live News Update : पुण्यातील रिंग रोड आणि महामार्गांना अजित पवारांचे नाव द्या,रोहित पवारांची मागणी

Insulin resistance: सतत भूक लागतेय, थकवा येतोय? डायबेटीजचं सुरुवातीची लक्षणं असू शकतं, शरीरातील ५ बदलांकडे दुर्लक्ष करू नका!

SCROLL FOR NEXT