Pune : SRPF च्या परीक्षेत भावाच्या जागेवरती पेपर देणाऱ्या तरुणाला अटक ! Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : SRPF च्या परीक्षेत भावाच्या जागेवरती पेपर देणाऱ्या तरुणाला अटक !

SRPF च्या रविवारी झालेल्या लेखी परिक्षेत एका तरुणाने आपल्या भावाच्या जागेवर पेपर देण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी त्याने ब्ल्युटुथचा वापर केल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : SRPF च्या रविवारी झालेल्या लेखी परिक्षेत एका तरुणाने आपल्या भावाच्या जागेवर पेपर देण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी त्याने ब्ल्युटुथचा (Bluetooth) वापर केल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे.

हे देखील पहा -

ब्ल्युटुथद्वारे कॉपी करण्याचा प्रयत्न केल्याने त्याला अटक करण्यात आली असून हडपसर पोलिस ठाण्यात (Hadapsar Police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल गबरुसिंग बहुरे जोडवाडी, औरंगाबाद असं अटक केलेल्याचे नाव आहे .

भरतसिंग गबरुसिंग बहुरे (रा. जोडवाडी, औरंगाबाद) या त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. SRPF भरतीची रविवारी लेखी परिक्षा होती. हडपसर येथील एस एम जोशी कॉलेजमध्ये (S.M Joshi College) या परिक्षेचे केंद्र होते. विशाल हा त्याचा भाऊ भरतसिंग याच्या नावाने लेखी परिक्षा देण्यास आला होता. परिक्षा देत असताना त्याने कॉपी करण्यासाठी ब्ल्युटुथचा वापर केला होता मात्र त्याचा हा गैरप्रकार उघडकी आला आणि आता त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT