yashwantrao chavan bridge closure for repairs traffic diverted till 29 feb pune news saam tv
मुंबई/पुणे

Pune News : कर्वे- शास्त्री रस्त्याला जाेडणारा पूल आजपासून महिनाभर वाहतुकीस बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

छत्रपती संभाजी महाराज पुलावरून काही वर्षांपूर्वी दुचाकी वाहनांना बंदी करण्यात आली होती. त्यावेळी फक्त दुचाकी वाहनांसाठी हा पूल वापरण्यास प्रारंभ झाला.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Pune News :

पुण्यातील कर्वे रस्ता (karve road) आणि शास्त्री रस्त्याला (shastri road) जोडणारा तसेच फक्त दुचाकी वाहनांसाठी पूना हाॅस्पिटल (poona hospital) नजीक असलेला यशवंतराव चव्हाण पूल (yashwantrao chavan bridge) धोकादायक झाला आहे. या पुलाचे काम आजपासून (ता. २ फेब्रुवारी) सुरु हाेत आहे. परिणामी २९ फेब्रुवारीपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दुचाकी वाहनांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पुणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी केले आहे. (Maharashtra News)

पुण्यातील पूना हॉस्पिटल शेजारी असलेला यशवंतराव चव्हाण पूल हा पूल धोकादायक झाला आहे. पुणे महापालिकेने या पुलाचे ऑडिट केले होते. यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये या पुलाचे बेअरिंग आणि सस्पेंशन जॉइंट बदलण्याचे काम करण्यात येणार आहे.

या कामासाठी हा पूल २ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन महापालिका तसेच वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छत्रपती संभाजी महाराज पुलावरून काही वर्षांपूर्वी दुचाकी वाहनांना बंदी करण्यात आली होती. त्यावेळी फक्त दुचाकी वाहनांसाठी हा पूल होता, तसेच त्यावर चारचाकी वाहनांना बंदी होती.

असा आहे पर्यायी मार्ग

शास्त्री रस्त्यावरून कर्वेनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी गांजवे चौक येथून टिळक चौक-छत्रपती संभाजी महाराज पूल (लकडी पूल) खंडोजीबाबा चौकाच्या मार्गाचा वापर करावा.

कर्वे रस्त्यावरून आलेल्या वाहनांनी खंडोजीबाबा चौक छत्रपती संभाजी महाराज पुलावरून टिळक चौकातून इच्छित स्थळी जावे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

SCROLL FOR NEXT