Worli Hit And Run Case Saam Tv
मुंबई/पुणे

Worli Hit And Run Case: वरळीत महिलेला उडवणारी भरधाव कार शिंदेंच्या शिवसेना नेत्याची, अपघातावेळी कारमध्ये होता मुलगा आणि ड्रायव्हर

Priya More

मयूर राणे, वरळी

वरळी हिट अँड रन प्रकरणात (Worli Hit And Run Case) मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजेश शहा (Rajesh Shah) असं त्यांचे नाव असून अपघातावेळी त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर कारमध्ये होते. राजेश शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत. पोलिसांनी याप्रकरणी राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शाह आणि ड्रायव्हरविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत.

मुंबईच्या वरळी येथे आज सकाळी साडेपाचच्या सुमारास अपघाताची ही घटना घडली. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीवरून कोळी दाम्पंत्य प्रवास करत होते. कारच्या धडकेनंतर कावेरी नाकवा गंभीर जखमी झाल्या. या कारने कावेरी यांना फरफटत नेले. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या कावेरी यांना नायर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषीत केले. तर कावेरी यांचा नवरा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर कार चालकाने न थांबता तो घटनास्थळावरून पळून गेला.

वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा दांपत्य हे दुचाकीवरून ससून डॉकला मासे आणण्यासाठी गेले होते. मासे घेऊन परत घराच्या दिशेने येत असताना पाठीमागून आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. दुचाकीवर जास्त वजनाचे मासे असल्यामुळे नाकवा यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दोघेही कारच्या बोनेटवर पडले. अशामध्ये नाकवा यांनी लगेच बाजूला उडी मारल्यामुळे ते अपघातामध्ये बचावले. पण त्यांच्या पत्नी कावेरी यांना बाजूला होता आले नाही. कार चालकाने कावेरी यांना फरफटत नेले.

घाबरलेल्या कार चालकाने अपघातानंतर तिथे न थांबता पळ काढला. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या कावेरी नाकवा यांना ताबडतोब पोलिसांनी नायर रुग्णालयात उपचारासाठी हलवले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. तर कावेरी यांच्या गंभीर जखमी झालेल्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा तपास वरळी पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर कारचे मालक शिवसेना शिंदे गटाचे नेते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर त्यांच्या मुलाचा आणि कार चालकाचा पोलिस शोध घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT