pregnant women, Health tips, Pregnancy tips, diet plan for pregnant women
pregnant women, Health tips, Pregnancy tips, diet plan for pregnant women Saam tv
मुंबई/पुणे

Health Tips for Pregnant Women : मद्यपान करणाऱ्या महिलांनो सावधान; गरोदरपणात मद्य पिण्याचे भयंकार परिणाम आले समोर

गोपाल मोटघरे

Health Tips for Pregnant Women : तुम्ही जर गर्भवती असाल आणि गर्भधारणे दरम्यान तुम्ही जर मद्यपान करत असाल तर सावध व्हा. कारण गर्भधारणे दरम्यान मद्यपान केल्याने त्याचे दुष्परिणाम मुलाच्या मेंदूवर आणि त्याच्या एकूणच वाढीवर होऊ शकतात असे नुकतेच संशोधन समोर आले आहे. (Latest Marathi News)

ऑस्ट्रेलिया येथील व्हिएन्ना विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात गर्भधारणे दरम्यान केलेल्या मद्यपानाच्या परिणामांची काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. गर्भ गरोदरपणात एक पेग अल्कोहोल देखील तुमच्या मुलाच्या मेंदूची वाढ थांबवू शकते असं या संशोधनात समोर आल आहे.

संशोधकांनी २४ गर्भवती महिलांचं एम आर आय स्कॅन विश्लेषण केलं. त्यात ज्या मातांनी अल्कोहोल सेवन केलं होतं. अशा महिलांच्या (Women) गर्भाची एकूणच परिपक्वता अर्थात एफ टी एम एस लक्षणीयरीत्या कमी होती.

एफ टी एम एस ही मनाच्या परिपकवतेची गणना करणारी प्रणाली आहे. ती कमी झाली म्हणजे मुलांच्या मेंदूची एकूनच वाढ कमी होतें. यासोबत संशोधक पथकाने त्या भृणांमध्ये असे निरीक्षण केले की, त्यांच्या मेंदूच्या सुपिरियर टेंपोरेल सक्लस नावाचा एक भाग देखील योग्य प्रकारे विकसित झालेले नाही. मेंदूचा हा भाग माणसांमध्ये सामाजिक जाणीवा, पाहण्याची, ऐकण्याची, समजण्याची आणि एकाग्रतेची शक्ती निर्माण करते असं संशोधनात म्हटल आहे

त्यामुळे तुम्ही जर गरोदर राहण्याच विचार करत असाल, तर गर्भधारणेच्या तीन महिन्या आधीपासूनच मद्यपान करण्यात टाळा, असं आवाहन स्त्री रोग तज्ञ करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narendra Modi: कलम ३७० पुन्हा लागू करण्याची कुणामध्येही हिंमत नाही; पंतप्रधान मोदी कडाडले

Bomb Threat Mailed To Nagpur Airport: नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवणार, धमकीचा मेल; पोलिसांकडून मॉक ड्रिल

IPL मॅचचं बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरण, तमन्ना भाटियाने चौकशीसाठी मागितला वेळ

Heatwave Care: उष्माघाताच्या त्रासापासून वाचण्यासाठी 'अशी' काळजी घ्या

Today's Marathi News Live : नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू; धमकीच्या मेलने खळबळ

SCROLL FOR NEXT