Kasaba Election Saam TV
मुंबई/पुणे

Kasba Byelection: पैसे घेतले नाही म्हणून महिलांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण, गुन्हा दाखल

महिलांच्या तक्रारीवरुन याप्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Prachee kulkarni

Pune Byelection : पुण्यात आज कसबा आणि चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. पहिल्या दिवसांपासूनच पुणे पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. कसबा निवडणुकीत भाजपची आधीपासून पिछेहाट होत असल्याचा दावा तज्त्र आणि विरोधकांकडून केला जात होता. मात्र पैसे घेतले नाही म्हणून भाजप नगरसेवकाने नागरिकांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कसब्यात घडला आहे.

भाजप नगरसेवकाने आपल्याला मारहाण केली तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. महिलांच्या तक्रारीवरुन याप्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. (Political News)

महिलांनी केलेल्या आरोपानुसार. भाजप कार्यकर्ते त्यांच्या घरी आले आणि पैसे देऊ केलं. तसेच कमळाला मतदान करण्याचं आवाहन केलं. मात्र त्याला आम्ही नकार देत आम्ही तसे लोक नाहीत असं म्हटलं. मात्र त्यानंतर संतापलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला शिवीगाळ करत मारहाण केली.

महिलांना मारहाण केल्याचा उल्लेख FIRमध्ये असूनही पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा का दाखल केला नाही, असा सवाल महाविकासआघाडीच्या नेत्यांनी विचारला आहे. महिलांना मारहाण झालेली असतांनाही अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल का नाही केला. तसा गुन्हा दाखल झाला असता तर आरोपींना तत्काळ अटक झाली असती. मात्र तशी कारवाई न झाल्याने सर्व आरोपी आज मतदाना केंद्रांवर दिसत असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या बसची चावी घेऊन ठोकली धूम; जंतर-मंतरवर महिलेचं कृत्य पाहून पोलीस चक्रावले, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी पप्या शिंदेच्या पोलीस कोठडीत वाढ; 9 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

SCROLL FOR NEXT