Thane news Saam TV
मुंबई/पुणे

Thane News : ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण, CCTV Footage आलं समोर

Political News : ठाकरे गटाचा कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना सोमवारी (3 एप्रिल) संध्याकाळचा सुमारास शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली

विलास काटे

Thane News: शिवसेनेतील (Shivsena) फुटीनंतर अनेक महिने उलटून गेले असले तरी दोन्ही गटातील नेत्यांमध्ये धुसपूस अजूनही सुरुच आहे. कार्यकर्तेही एकमेकांविरुद्ध आक्रमक असलेले पाहायला मिळत आहे. कारण ठाण्यात शिंदे गटाच्या महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

ठाण्यातील कासारवडवली येथे ही घटना घडली आहे. ठाकरे गटाचा कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना सोमवारी (3 एप्रिल) संध्याकाळचा सुमारास शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

रोशनी शिंदे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटलं की, मी टाटा मोटर्स कासारवडवली येथे माझ्या ऑफिसमध्ये कामावर रुजू असताना कामावर सुटण्याची वेळ झाली असताना सायंकाळी 8 वाजून 25 मिनिटांनी शिंदे गटाच्या पूजा तिडके, माजी नगरसेविका नम्रता भोसले, प्रियांका मसुरकर, प्रतिक्षा विचारे, हर्षाली शिंदे, रोहिणी ठाकूर, अनघा पवार, सिद्धार्थ ओवळेकर व इतर १५ महिला अशा एकत्रित ऑफिसमध्ये घुसून मला शिवीगाळ करून मारहाण केली.

मी शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची युवती सेना म्हणून काम करत आहे. पक्षाच्या प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिंदे गटाचे दत्ताराम गवस यांनी अक्षेपार्ह पोस्ट केली होती त्याला प्रत्युत्तर म्हणून मी माझे मत त्या ठिकाणी मांडले होते. परंतु दत्ताराम गवस यांनी माझ्यावर वैयक्तिक कमेंट केली. त्यावेळी मी त्यांना प्रत्युउत्तर दिलं. जे मी अर्जासोबत जोडलेलं आहे.

मी माझ्या कमेंटमध्ये कुठेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पत्नीचा उल्लेख केला नसतानाही मला वारंवार धमकीचे कॉल येऊ लागले होते. यासंदर्भात माझी चूक नसताना आणि मला भांडण वाढवायचे नव्हते म्हणून भी सॉरीची पोस्ट केली होती. असं असताना सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये काही महिला एकत्र घुसून माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी सखोल चौकशी करून तत्काळ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती रोशनी शिंदे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT