pune news Saam tv
मुंबई/पुणे

Pune News : गाडी बाजूला थांबवली, त्यानंतर घाणेरड्या नजरेने बघू लागला अन्...; पुण्यातील महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव

Pune Latest News : पुण्यातील महिलेने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : राज्यात अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. राज्यासहित पुण्यातही महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेपासून कार्यालयापर्यंत महिला लैंगिक शोषणाच्या बळी ठरत असल्याचे समोर येत आहे. पुण्यातील अशाच एका महिलेला रस्त्यावर एका विचित्र अनुभवाला सामोरे जावं लागलं. त्यानंतर या महिलेने सोशल मीडियावर अनुभव कथन केला.

पुण्यातील आरटीओ रोडजवळ एका महिलेसोबत विचित्र प्रकार घडला. रस्त्यावरच घाणेरड्या प्रकारानंतर महिलेने संपूर्ण प्रकार सांगितला. २ दिवसांपूर्वी घडलेला अनुभव महिलेने सोशल मीडियावरून व्हिडिओ पोस्ट करून सांगितला आहे.

महिलेसोबत नेमकं काय घडलं?

'एक गाडी माझ्या गाडीच्या बाजूला येऊन थांबली. त्यानंतर या गाडीमधील व्यक्ती माझ्याकडे सतत बघत होता. मोबाईलमधून मी त्याचं कृत्य रेकॉर्ड करत असतानाही त्या माणसाची नजर खाली जात नव्हती, असा अनुभव पुण्यातील एका महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आणला आहे. २ दिवसांपूर्वीची घटना पुण्यातील आरटीओ रोड जवळ घडल्याचं या महिलेने व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.

स्टॉक करणारा म्हणजेच एक टक पाहत असलेला त्या व्यक्तीच्या गाडीवर पुणे महानगरपालिका लिहिले होतं, असं या महिलेने सांगितलं आहे. एम एच १२ आर आर ०७११ असा या गाडीचा क्रमांक असून या गाडीवर पुणे महानगरपालिकेचे स्टिकर स्पष्टपणे या व्हिडिओमधून दिसून आलं आहे. आता पुण्यातील या महिलेच्या तक्रारीवरून प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

पुण्यात छेड काढण्यावरून वाद; एकाला कोयत्याने वार करून संपवलं

तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणाशी झालेल्या वादातून एका ४० वर्षीय व्यक्तीवर कोयत्यानं हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील खेड तालुक्यातील कडूसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure Foods: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ जरूर खा, हार्ट देखील राहिल हेल्दी

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

SCROLL FOR NEXT