Pune crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पुणे हादरलं! हडपसरमध्ये महिलेला मारलं अन् पलंगात ठेवलं, नवरा घरात आल्यावर....

Pune Latest Crime News : पुण्यात हादरवून टाकणारी घटना घडली आहे. घरात एकटीच असणाऱ्या महिलेची हत्या करून पलंगात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

Namdeo Kumbhar

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

Pune Hadapsar Latest Crime News : पुण्यामध्ये पुन्हा एकदा हादरवून टाकणारी घटना घडली आहे. घरात एकटीच असणाऱ्या महिलेची हत्या करून पलंगात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हडपसरमधील फुरसुंगीमध्ये ही घटना घडली. हत्या कुणी केली? का केली? विवाह बाह्य संबंध होते का? याबाबत पोलीस तपास करत आहेत. नवऱ्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील हडपसर भागातील फुरसुंगी परिसरातील धक्कादायक घटना समोर आली. घरात एकटीच असलेल्या महिलेचा खून करून तिचा मृतदेह पलंगाच्या कप्प्यात लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली. महिलेचे खून कोणी केला आणि त्यामागचे कारण काय आहे, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. स्वप्नाली पवार असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नाली यांचे पती उमेश मोटारचालक आहेत. ते शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास प्रवासी घेऊन बीडला गेले होते. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ते घरी परतले. तेव्हा घराला बाहेरून कडी होती. कडी उघडल्यानंतर पत्नी घरात दिसली नाही. त्यामुळे त्यांनी पत्नीचा शोध घेतला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही.

त्यांनी घरातील दागिने, रोकड, पत्नीचा मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला. दागिने, रोकड पलंगात ठेवली का? हे पाहण्यासाठी त्यांनी पलंग उघडला. तेव्हा त्यांना त्‍यात पत्नीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिली. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT