Mumbai Metro Line woman died google
मुंबई/पुणे

Metro Line: मेट्रोच्या खड्ड्यात पडून महिलेचा मृत्यू, मेट्रो प्रशासन-पालिकेच्या वादात महिलेचा बळी ?

Woman Died : मुंबईत एक धक्कादायक घटना घडलीय. मेट्रो लाईन ३ चे काम सुरू आहे. मात्र या कामासाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्याने एका महिलेचा जीव घेतलाय.

Tanmay Tillu

आता बातमी मुंबईतून एक धक्कादायक बातमी हाती आली आहे. मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय. मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात ही दुर्घटना घडलीये. सिप्स कंपनीच्या समोर मेट्रो लाइन - 3चे काम सुरू आहे. या ठिकाणी खोदलेल्या खड्ड्यात पडून महिलेचा मृत्यू झालायं. पालिकेच्या निष्काळजीपणाचे हा बळी असल्याचा संताप आता व्यक्त होतोय. पाहूया.

मुसळधार पावसानं बुधवारी महामुंबईला झोडपून काढलं. अशातच पावसामुळे एक दुर्दैवी घटना घडली. मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय. मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात ही दुर्घटना घडलीये. सिप्स कंपनीच्या समोर मेट्रो लाइन - 3चे काम सुरूए. या ठिकाणी खोदलेल्या खड्ड्यात विमल गायकवाड ही महिला पडली आणि 100 मीटर वाहून गेली. अग्निशमन दलाचे जवानांनी तब्बल एक तास शोध घेतल्यानंतर विमल यांना नाल्यातून बाहेर काढण्यात आलं. मात्र यात त्यांचा मृत्यू झाला.

2017 मध्ये डॉ.हमरापुरकर यांचाही असाच मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. वरळी परिसरातील सांडपाण्याच्या पाइपलाइनमध्ये त्यांचा मृतदेह सापडला होता. जवळपास 36 तास ते बेपत्ता होते. दरम्यान काम केल्यानंतर हा रस्ता पालिकेकडे हॅन्ड ओव्हर करायचा होता. मात्र, मुंबई महानगरपालिकेनं पत्र लिहून संपूर्ण रस्त्याचं पहिल्या सारखं काम करून मग हँड ओव्हर करा, असं पत्र दिलं होतं..त्यामुळे मेट्रो प्रशासन आणि महापालिकेच्या वादात महिलेचा बळी गेल्याचं बोललं जातंय तर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रशासनावर आणि सरकारवर ताशेरे ओढलेत.

मुंबई महापालिकेने उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिलेत,पुढे चौकशी होईल, गुन्हे दाखल होतील कुटुंबाला नुकसान भरपाई देखील मिळेल मात्र पालिकेच्या निष्काळजीपणाचे हे बळी कधी थांबणार ? मॅनहोल उघडे ठेवणाऱ्या पालिका प्रशासनावर आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे कधी दाखल होणार आणि सामान्यांचं जगणं कधी सुरक्षित होणार असे अनेक सवाल अनुत्तरीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

Maharashtra Live News Update : पुण्यातील यशवंत नाट्यगृहात वंचित बहुजन आघाडीचा राडा

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात; भरधाव कार तीन-चार वेळा उलटली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : शिंदेच्या शिवसेनेला मोठा हादरा! नाराज पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

Pimples On Face: चेहऱ्यावर पिंपल्स येताहेत? ही चूक ठरतेय कारणीभूत, आजच सोडा 'या' वाईट सवयी

SCROLL FOR NEXT