Navi Mumbai Chincholi Lake saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai News : नेरूळच्या तलावात पाण्यावर तरंगताना आढळला महिलेचा मृतदेह; नवी मुंबईत खळबळ

Woman Body Found in Chincholi Lake : नवी मुंबईतील नेरूळ येथील चिंचोली तलावात एका महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Saam Tv

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

नवी मुंबईतील नेरूळ येथे आज शुक्रवारी चिंचोली तलावातील पाण्यावर एका महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. मृत महिलेचं वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे आहे. या महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या झाली, याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.

नवी मुंबईत नेरूळजवळ महापालिकेचं चिंचोली शिरवणे तलाव आहे. या तलावात एका महिलेचा मृतदेह आढळला. तिचा मृतदेह पाण्यावर तरंगला होता. ही माहिती परिसरात समजल्यानंतर एकच खळबळ माजली. पोलीस, महापालिका प्रशासनातील कर्मचारी-अधिकारी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी महिलेचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात तो विच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. ही महिला नेमकी कोण आहे याबाबतची माहिती वृत्त हाती येईपर्यंत समजले नाही. तिची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

हत्या की आत्महत्या? तपास सुरू

चिंचोली तलावात पाण्यावर महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांसह स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच अग्निशमन कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला. वाशी येथील रुग्णालयात तो पाठवण्यात आला. या महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या झाली, याबाबतचा तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rava Khobryache Modak Recipe : ना उकड, ना जास्त मेहनत! फक्त २ पदार्थांत बनवा गणरायाचे आवडते रवा-खोबऱ्याचे मोदक

Vidyanand Bapat: श्रद्धेचा अवमान नको! विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस; ४८ तासांत बिनशर्त माफीची मागणी

Maharashtra News Live Update: विष प्राशन करून शेतकरी महिलेचा मृत्यू

Pune Metro : गणेशोत्सवात पुणेकरांना मोठा दिलासा! दर ५ मिनिटांनी धावणार मेट्रो, जाणून घ्या सविस्तर माहिती

Ratnagiri Beach : चंद्रकोरासारखा दिसतो कोकणातील 'हा' समुद्रकिनारा, नजरेत साठवावे असे सुंदर रुप एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT