Vasant More Twitter Post Twitter/@vasantmore88
मुंबई/पुणे

वसंत मोरे मनसेत राहणार की जाणार? पोस्ट झाली व्हायरल

मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदावरून हटवल्यानंतर वसंत मोरे यांनी लगेच ट्विट आणि फेसबुक पोस्ट केली आहे.

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

अश्विनी जाधव केदारी

पुणे : मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदावरून हटवल्यानंतर वसंत मोरे यांनी लगेच ट्विट आणि फेसबुक पोस्ट केली आहे. अरे, मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. वसंत मोरेंच्या या पोस्टची जोरदार चर्चा असून, ते पक्षातच राहणार की पक्ष सोडणार? याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

गुढीपाडवानिमित्त मुंबईत झालेल्या मनसे मेळाव्यात पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. भोंगे हटवले नाहीत, तर मशिदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालीसा लावण्यात येईल, असे ते म्हणाले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या. एकीकडे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते, तर मनसेचे पुण्यातील शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी वेगळी भूमिका घेतली होती. आपल्या प्रभागात शांतता हवी म्हणून मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणार नाही, असं ते म्हणाले होते. यानंतर राज ठाकरे वसंत मोरेंवर नाराज होते. वसंत मोरे यांना मनसे शहराध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे. यानंतर या पदावर साईनाथ बाबर यांची निवड केली आहे.

वसंत मोरे यांना पदावरून हटवल्यानंतर, त्यांनी फेसबुक आणि ट्विटवर पोस्ट केली आहे. यात त्यांनी साईनाथ बाबर यांचे अभिनंदन केले असून, त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. 'अरे, मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे. कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्षपदी निवड झाली असून, खूप खूप अभिनंदन साई...' असे मोरे यांनी नमूद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उरळी कांचन येथे लक्ष्मण हाके यांच्या मोर्चामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी

Krishna Janmashtami 2026: यंदाच्या जन्माष्टमीला द्वापार युगासारखा दुर्मिळ महासंयोग! ४ राशींचं उजळणार भाग्य

Mangalsutra Designs: नवरा- बायकोच्या नावाचं मंगळसूत्र, या 5 डिझाईन्स पाहून प्रेमात पडाल

Thyroid Health : तुमचंही वजन विनाकारण वाढतंय? 'या' ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकतो थायरॉईड

Global Warming : मुंबई जगाच्या नकाशावरून गायब होणार? UN च्या अहवालात भारताला भयानक इशारा; पुढील काही वर्षांत काय घडणार?

SCROLL FOR NEXT