Navneet Rana Ravi Rana Latest News Updates, Hanuman chalisa controversy
Navneet Rana Ravi Rana Latest News Updates, Hanuman chalisa controversy  Saam TV
मुंबई/पुणे

राणा दाम्पत्याच्या जामिनावर आज फैसला? मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राणा दाम्पत्याकडून मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचण्याचा आग्रह धरला होता. यानंतर शिवसेना (Shivsena) विरुद्ध राणा दाम्पत्य असा वाद रंगला होता. राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या ते तुरुंगात आहेत. (Navneet Rana Ravi Rana Latest News Updates)

हे देखील पाहा -

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दाम्पत्याच्या जामिन याचिकेवर आज उत्तर देण्याचे निर्देश सत्र न्यायालयाच्यावतीनं राज्य सरकारला देण्यात आले होते. त्यानुसार, राज्य सरकारच्या वतीनं उत्तर दाखल करण्यात आलं. त्यानंतर आज दुपारी 12 वाजता ही सुनावणी होणार आहे.

आमदार रवी राणा यांच्या विरोधात 17 गुन्हे दाखल आहेत तर खासदार नवनीत राणांविरोधात 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांचा या जामीनाला विरोध आहे. राणा दाम्पत्या अनेक गुन्हे दाखल आहेत. खोटे जात प्रमाणपत्र दिल्याचे आरोप देखील नवनीत राणा यांच्यावर आहेत. दोघांनाही जामीन मिळाल्यास बाहेर पडल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतोअसा पोलिसांचा दावा आहे. दरम्यान, गुरुवारी राणा दाम्पत्यानं घरचं जेवण मिळण्यासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्याचा जेल मधील मुक्काम वाढणार की त्यांना दिलासा मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

SCROLL FOR NEXT