Abu Azmi Ajit Pawar Group Latest News  Saam TV
मुंबई/पुणे

Abu Azmi News: मोठी बातमी! अबू आझमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार? अजित पवारांची ताकद वाढणार!

Abu Azmi Will Join NCP: समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार, अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे.

Satish Daud

Abu Azmi Ajit Pawar Group Latest News

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार, अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत अबू आझमी यांची प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत चर्चा देखील झाल्याची माहिती आहे.

येत्या तीन ते चार दिवसांत अबू आझमी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश होऊ शकतो, असंही सूत्रांनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अबू आझमी हे समाजवादी पक्षात नाराज आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, यासाठी भाजपचा एक नेता प्रयत्नशील असल्याचं बोललं जातंय.

मात्र, अबू आझमी यांना भाजपमध्ये प्रवेश करणं शक्य नसल्याने ते अजित पवार गटात (Ajit Pawar) प्रवेश करणार, असं सूत्रांनी सांगितलं आहे. या अनुषंगाने त्यांची प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत भेट झाली असून लवकरच त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे.

अबू आझमी यांच्या पाठीशी मुस्लिम मतदार जास्त आहे. विशेषत: मुंबईतील मुस्लिम समाजाचा अबू आझमी यांना पाठिंबा आहे. अशातच जर अबू आझमी राष्ट्रवादीत गेले तर अजित पवार यांची ताकद वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, अबू आझमी एकटेच राष्ट्रवादीत जातात. समाजवादी पक्षाचे इतर नेतेही राष्ट्रवादीत प्रवेश करतात हे पाहणं महत्वाचं असेल.

अबू आझमी कोण आहेत?

अबू आझमी हे समाजवादी पक्षाचे नेते असून ते मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर या मुंबईतील मतदारसंघाचे ते आमदार आहेत. मानखुर्दमध्ये अबू आझमी यांची मोठी ताकद आहे. या मतदारसंघातून ते सलग तीनवेळा निवडून आले आहेत. याशिवाय ते राज्यसभेचे खासदार देखील राहिलेले आहेत. महाराष्ट्रात समाजवादी पक्ष वाढवण्यात अबू आझमी यांचा मोठा हातभार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Get Rid Of Dark Lips Naturally: काळे ओठ गुलाबी कसे करायचे? फॉलो करा या 3 सोप्या स्टेप्स

Ameesha Patel : अमिषा पटेल अडचणीत; आर्थिक फसवणूक प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट, नेमकं प्रकरण काय?

Solapur Tourism : मराठ्यांच्या इतिहासाशी जोडलेला सोलापूरमधील महत्त्वाचा किल्ला, 'या' ठिकाणी नक्की भेट द्या

Crime News : लुटेरी दुल्हन! मुलगी दाखवून रितसर लग्न अन् मग टोळीनं शेतकऱ्याला लुबाडले, यवतमाळमध्ये नेमकं चाललंय काय?

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार २०,००० रुपये; आताच करा गुंतवणूक

SCROLL FOR NEXT