CM Uddhav Thackeray Live Saam Tv
मुंबई/पुणे

CM Uddhav Thackeray Live:...तर 'आरएसएस'ची टोपी काळी का?; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

हिंदुत्व डोक्यावर नाही तर डोक्यात पाहीजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेनेची (Shivsena) आज मुंबईत मास्टर सभा सुरु आहे. या सभेत मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. यात भाजपच्या हिंदुत्वावरुन टोले लगावले. भगव्या टोपीवरुन ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. तुमची टोपी जर भगवी असेलतर मग आरएसएस ची टोपी काळी का, असा सवाल करत ठाकरे यांनी भाजपला (BJP) टोला लगावला. (CM Uddhav Thackeray Live)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, अयोध्येत मशिद पाडण्यासाठी तुम्ही होता म्हणता तर मग देवेंद्रजी फक्त तुमच्या वजनाने बाबरी पडली असती. फडणवीस यांचे १ मे रोजी भाषण झाले. यावेळी त्यांनी भगवी टोपी घालून भाषणं केलं होतं. हिंदुत्व डोक्यावर नाही तर डोक्यात पाहीजे. तुमची टोपी जर भगवी असेल तर मग आरएसएस ची टोपी काळी का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, तुमच्या १७६० पिढ्या आल्या तरीही मुंबई स्वतंत्र होणार नाही. कोणीही आले तरी ही मुंबई स्वतंत्र होऊ देणार नाही. बुलेट ट्रेन कशाला हवी आहे. कोणाल हवी आहे. तुम्हाला मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे. मागे खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबत होता, ते देशाची दिशा भरकटवत आहेत असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, बाळासाहेबांना देवळात घंटा बडवणारा हिंदू नको होता तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे होता. आपले हिंदुत्व गदाधारी आहे, इतरांचे घंटाधारी आहे. बसा बडवत घंटा. काय मिळालं, घंटा. असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकरीच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शांतता कालावधी सोमवारच्या संध्याकाळपर्यंत

Manipur Politics : भाजपला मोठा झटका; NPPने पाठिंबा काढला, मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं?

Pushpa 2 : The Rule Trailer : ''पुष्पा, फायर नहीं, वाइल्ड फायर है..'', पुष्पा 2 : द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

SCROLL FOR NEXT