Sushma andhare On Nilesh Rane Saam tv
मुंबई/पुणे

Sushma andhare: जरांगे यांच्यावर गुन्हे दाखल करायचे तर, नितेश राणेंच्या भाषणावर गुन्हा दाखल का नाही झाला? अंधारेंचा सवाल

Sushma andhare On Nilesh Rane: ''जरांगेंवर गुन्हा दाखल करायचे असतील तर नितेश राणेंच्या भाषेचं काय? नितेश राणेंवर का गुन्हे दाखल होत नाहीत'', असा प्रश्न ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारला केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Sushma andhare On Nilesh Rane:

''जरांगेंवर गुन्हा दाखल करायचे असतील तर नितेश राणेंच्या भाषेचं काय? नितेश राणेंवर का गुन्हे दाखल होत नाहीत'', असा प्रश्न ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारला केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत एसआयटी नेमण्यात येणार आहे. याचबद्दल बोलताना त्या म्हणाला की, ''मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री संविधानिक पद आहे. त्या पदावरच्या व्यक्तींवर टीका करताना संयम समतोल असावा एकेरी भाषेचा वापर करू नये.'' कल्याण येथे आज सुषमा अंधारे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्या असं म्हणाल्या आहेत.

''केशव उपाध्ये ,माधव भंडारी यांच्यासारख्या निष्ठावंत लोकांबद्दल आम्हालाही वाईट वाटतं''

सुषमा अंधारे म्हणाल्या की, मोदींच्या गॅरंटीवर टीका करताना मोदी गॅरंटी म्हणजे काय हे मला अजून कळत नाही. सिंचन घोटाळ्याचे आरोप केलेल्यांना डीसीएम करू ही मोदींची गॅरंटी की, ज्या भावना गवळी आरोप केले तिलाच बहीण बनवू ही मोदींची गॅरंटी आहे. मोदी भाजप पदाधिकाऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी असं काहीतरी बोलतात, असं वाटतं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्या म्हणाल्या, पहिला मंत्रिमंडळातील विस्तारात दहा सीट या शिवसेना शिंदे गटाच्या वाटेल गेल्या. दुसऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला गेल्या. मूळ भाजपाच्या हातात काहीच नाही. त्यामुळे केशव उपाध्ये, माधव भंडारी यांच्यासारख्या निष्ठावंत लोकांबद्दल आम्हालाही वाईट वाटतं. अशा निष्ठावंत लोकांमध्ये नाराजी येऊ न,ये ते बंडाचा झेंडा हाती घेऊ नये, म्हणून मोदी हे अशा पद्धतीने गॅरंटी देतात.  (Latest Marathi News)

Kalyan Lok Sabha Constituency: पुढील आठ दिवसात कल्याण लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होईल: सुषमा अंधारे

ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती, तशी मागणी देखील स्थानिक शिवसैनिकांकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती. याबाबत बोलताना सुषमा अंधारे यांनी शिवसैनिकांनी केलेल्या मागणीचा मी मनापासून आदर करते, परंतु मला व्यक्तिगत विचाराल तर अजून माझ्यापर्यंत अधिकृत अशिकेत माहिती पोचलेले नाही.

कल्याण लोकसभेत पक्षप्रमुख जो उमेदवार देतील त्याच्या प्रचार मी करेन, मी या मतदारसंघात तळ ठोकून राहील, याचा अर्थ असा नाही की, मी लगेच निवडणूक लढणार आहे. मुक्त संवादाच्या दौऱ्याअंतर्गतच कल्याण लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी घेतल्यात. उमेदवार जाहीर करणे हे पक्षप्रमुखांच्या अधिकारात आहे. पुढील आठ दिवसात कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चितपणे जाहीर होईल. जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवारासाठी सगळे शिवसैनिक ताकतीने लढतील, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT