Mumbai News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं रील्स स्टार्सवर बारीक लक्ष आहे, हे सर्वश्रूत आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी काही रील्स स्टार्सना शिवतीर्थावर बोलावून संवाद साधला होता. राज ठाकरेंनी आज त्यांच्या आवडत्या रील्स स्टार्सना भाषण थांबवून थेट व्यासपीठावरच बोलावलं.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने रीलची शान नवनिर्माणाचा सन्मान, महाराष्ट्र नवनिर्माण Reel Baaz पुरस्काराचं आयोजन आज केलं होतं. त्याठिकाणी राज ठाकरे उपस्थित होते. (Latest Marathi News)
मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यक्रमात राज ठाकरे भाषण करत होते. त्याचवेळी सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अथर्व सुदामे तिथे आला. त्यावेळी तू पण आलास का? हा माझा अत्यंत आवडता आहे. उभा राहा. तुझ्या सगळ्या गोष्टी मी पाहत असतो. अनेकांच्या बघतो.
बाकीच्यांनी वाईट वाटून घेऊ नका. मी दोघांनाच बोलवलं यात काही भेदभाव नाही. असं म्हणत अथर्व आणि विनायक माळी यांना दोघांना राज ठाकरेंनी थेट व्यासपीठावर बोलावलं.
पुढे राज ठाकरे यांनी म्हटलं की, तुमची जबाबदारी मोठी आहे. राज्यात ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत, त्याबद्दल प्रबोधन तुम्ही केलं पाहिजे. आज राज्यातलं राजकारण ज्या खालच्या स्थरावर गेलं, तितकं खाली तुम्हाला जायची गरज नाही.
मला असं वाटतं एखाद्या गोष्टीतून चिमटे कसे काढायचे आणि समजवायचं कसं? या गोष्टी तुम्ही उत्तमरित्या करु शकाल याची मला खात्री आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्यावं, असं मला वाटतं, अशी मला सर्वाकडून अपेक्षा आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.