अनेकांची फसवणूक करणारा NCB चा पंच कसा?; कोण आहे किरण गोसावी? SaamTvNews
मुंबई/पुणे

अनेकांची फसवणूक करणारा NCB चा पंच कसा?; कोण आहे किरण गोसावी?

आर्यन खानला ज्या क्रुझ प्रकरणात अटक झाली तेव्हा एनसीबीच्या टीम बरोबर नेमके कोण लोक होते असा सवाल उपस्थित झाला.

साम टिव्ही ब्युरो

प्राची कुलकर्णी

पुणे: आर्यन खान बरोबरचा सेल्फी प्रसिद्ध झाला आणि किरण गोसावी चर्चेत आला. आपण इथं पंच म्हणून गेलो होतो असा दावा करणाऱ्या गोसावीने मात्र यापुर्वी देखील प्रचंड उद्योग केले आहेत. आर्यन खानला ज्या क्रुझ प्रकरणात अटक झाली तेव्हा एनसीबीच्या टीम बरोबर नेमके कोण लोक होते असा सवाल उपस्थित झाला. यातलाच एक जण ज्याने अटक झालेल्या आर्यन बरोबर सेल्फी काढला तो होता किरण गोसावी. आपण पंच असल्याचा दावा करणारा हा गेली अनेक वर्ष ‌अनेक ‘उद्योग’ करतोय.

३७ वर्षांचा किरण गोसावी मुळचा जळगावचा. मात्र गेली अनेक वर्ष तो मुंबईत स्थायिक आहे. मुंबईतल्या वाशी परिसरातल्या एका बंगल्यात तो राहातो. त्याची आत्तापर्यंत तीन लग्न झाली आहेत. सध्या त्याच्या तिसऱ्या बायको सोबत तो रहात होता. आपण इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय करत असल्याचा दावा गोसावी करतो. मात्र या माध्यमातून फसवणुकीचे अनेक प्रकार त्याने केल्याचं समोर येतं आहे. गोसावी केपीजी नावाची कंपनी गेली काही वर्ष चालवायचा. त्याचं ॲाफिस देखील तो मुंबईत चालवायचा. या कंपनीच्या माध्यमातून तो फेसबुक द्वारे संपर्क साधून अनेकांना परदेशात नोकरी लावण्याचं अमिष दाखवत पैसे घ्यायचा.

प्रत्यक्षात मात्र यातल्या कोणालाही त्याने नोकरी लावली नव्हती. अनेक पोलिसांशी आपला संपर्क असल्याचा आणि आपण त्यांचा खबरी असल्याचा दावा हा गोसावी करतो. यामुळेच कार्डिलिया क्रुझवर देखील पोहोचल्याचं त्याचा दावा आहे. राजकीय क्षेत्रापासून ते पोलिसांपर्यंत अनेकांशी त्याची ओळख देखील असल्याचा दावा केला जातोय. कार्डीलीया प्रकरणात त्याच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अनेक आरोप असलेला हा गोसावी एनसीबीचा पंच कसा यावरुन आता संशय व्यक्त केला जातो आहे. पण अजून तरी याप्रकरणात त्याच्याकडे चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांकडे कोणीही संपर्क साधला नाहीये. त्यामुळे या तपासाअंती काय निष्पन्न होतंय हे पहावं लागेल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT