पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. वैष्णवी ही राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आलेल्या राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवी हगवणेने ९ महिन्यांच्या बाळाला सोडून मृ्त्यूला कवटाळलं. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या ९ महिन्यांच्या बाळाची विचारणा तिच्या आई-वडिलांकडून करण्यात आली. मात्र, ९ महिन्यांचं बाळ कुठे आहे, याचा थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे वैष्णवीच्या आई-वडिलांची चिंता वाढली होती. अखेर वैष्णवीचं ९ महिन्यांचं बाळ तिच्या कुटुंबीयांना आज गुरुवारी भेटलं. वैष्णवीचं बाळ इतक्या दिवस कुठं होतं, याविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वैष्णवीचं बाळ तिच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी समाधान व्यक्त केलं. ९ महिन्यांचं हे बाळ तब्बल ७ दिवसांनी कसपटे कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आलं. वैष्णवीचं बाळ इतक्या दिवस कुठे होते, याविषयी ठोस माहिती समोर आलेली नाही.
एका अज्ञात व्यक्तीने फोन करून बाळ आमच्या ताब्यात सोपवल्याचं वैष्णवीच्या काकाने सांगितलं. तर दुसरीकडे वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे याचा मावस भाऊ अमित पवळे याने इतक्या दिवस हे बाळ माझ्याकडे असल्याचा दावा केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना अमित पवळे याने दावा केला.
अमित पवळे याने सांगितलं की, 'वैष्णवीचं बाळ त्याच्या आत्याकडं होतं. त्यानंतर शंशाकचा मित्र निलेश चव्हाणकडे होतं. निलेश चव्हाणने हे बाळ आम्हाला दिलं. आम्ही ते बाळ सांभाळलं. माझे आई वडील त्या बाळाला घेऊन पोलिसांत गेले'.
वैष्णवी हगवणे प्रकरणात जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांना बावधन पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. गुन्हा शाखेच्या अँटी गुंडस्कॉडने ताब्यात चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. चांदेरे यांची बावधनच्या पोलीस चौकीत सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.