Maharashtra Monsoon Update Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Monsoon Update: मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याने दिली महत्वाची अपडेट

Monsoon Update in Maharashtra: उकाड्याने आणि कडाक्याच्या उन्हाने हैराण होऊन बसलेल्या तसंच शेतीसाठी पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

साम टिव्ही ब्युरो

Monsoon Update in Maharashtra: उकाड्याने आणि कडाक्याच्या उन्हाने हैराण होऊन बसलेल्या तसंच शेतीसाठी पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हवामान खात्याने मान्सूनबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. त्याचबरोबर यंदा राज्यात सरासरी 96 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. (Latest Marathi News)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता मान्सून अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे सरकला आहे. यावर्षी मान्सून हा ७ ते ८ दिवस संथ गतीने सुरू आहे. सध्या मान्सून अंदमान  (Monsoon Update) निकोबार बेटे पार करुन बंगालच्या उपसागरात आहे.

त्यामुळे मान्सूला केरळच्या भूमीवर पोहचायला ४ किंवा ५ जून उजाडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरवर्षी मान्सून १ जूनला केरळात पोहोचतो. आता, मात्र काही दिवस मान्सून लांबणीवर पडला आहे. (Breaking Marathi News)

दरम्यान, मान्सून आठ दिवस उशिराने बंगालच्या उपसागरात दाखल झाला असून येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून मालदीव बेटे, कौमारिन क्षेत्र व बंगालच्या उपसागरातील काही भाग व अरबी समुद्रातील काही भागांत दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार?

हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार (Weather Updates) येत्या १ जून रोजी मान्सून (Monsoon Update) केरळ आणि तामिळनाडूमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर ५ जूनपर्यंत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्येत मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहचू शकतो.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: खुशखबर! चांदी ₹१०,०००नी स्वस्त ! सोन्याचे दर किती? वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Periods Mental Health : पीरियड्समध्ये न चुकता करा 'ही' कामे, चिडचिड अन् मूड स्विंग्स होणारच नाही

Who Is Rajnandini Pawar: महाराष्ट्राची कन्या देशात ठरली सर्वात सुंदर! कोण आहे राजनंदिनी पवार? 'मिस इंडिया 2026' ची उपविजेती

Bhendwal Bhavishyvani: यावर्षी पाऊस कसा राहिल? शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा; देशावर आर्थिक संकट, वाचा भेंडवळच्या घटमांडणीचा A टू Z अंदाज

Maharashtra News Live Update: भिवंडीच्या मूलचंद कंपाऊंडमध्ये ऑइलच्या गोदामाला भीषण आग

SCROLL FOR NEXT