Raj Thackeray News  Saam tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray Interview : एक दिवस मुख्यमंत्री झाले तर काय कराल? राज ठाकरे म्हणाले...

Raj Thackeray Interview : खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Raj Thackeray Interview : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकदा माझ्या हातात सत्ता द्या, सगळ्यांना सूतासारखं सरळ करतो असं म्हटलं आहे. मात्र राज ठाकरे यांच्या हातात एक दिवस सत्ता दिली तर ते काय याचं उत्तर मिळालं आहे.

एका माध्यम समूहाच्या खाजगी कार्यक्रमात राज ठाकरे यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीत अमृत फडवणी यांनी राज ठाकरे यांना याबाबत विचारलं.

एक दिवस राज्यातील सत्ता हाती आली तर काय कराल? या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, एका दिवसात काय होतं? असं एका दिवसाला काही अर्थ नसतो. सहा महिने, एक दिवस, पाच दिवस यातून काही होतं असं मला काही वाटतं नाही. माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत ज्या सत्तेत राहून करता येतील. (Political News Update)

पोलिसांना फक्त 48 तासांचा मोकळा हात द्या

आपल्या देशात कायदे आहेत. आपल्याकडे लॉ आहेत, पण फक्त अधिकाऱ्यांना ऑर्डर नाहीत. माझा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. पोलिसांना केवळ 48 तास द्या आणि सांगा मला महाराष्ट्र साफ करुन द्या. सगळ्या गोष्टी त्यांना माहित असतात. पोलिसांना फक्त 48 तासांचा मोकळा हात द्या. ते सगळं नीट करतील, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी होतोय का?

अमोल कोल्हे यांनी प्रश्न विचारला की, विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी होतोय का? यावर राज ठाकरे म्हणाले, तपास यंत्रणा काही ठिकाणी दुरुपयोग होतोय. पण अनेक ठिकाणी खरे काम सुरू आहे. मला आठवतंय, काँग्रेच्या काळात रतन टाटा यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dal kachori recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी आणि क्रिस्पी डाळ कचोरी

India Tourism : वन्यजीव अभयारण्यात वसलाय किल्ला, भारतातील 'हे' ऐतिहासिक ठिकाण खूप कमी लोकांना माहितेय

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Mumbai Firing case : KRK ला पोलिसांनी घेतलं ताब्यात; अभिनेत्याने दिली गुन्ह्याची कबुली, नेमकं प्रकरण काय?

Accident : लग्नाआधी काळाचा घाला, नवरदेवाचा अपघाती मृत्यू, गर्लफ्रेंडसोबत होणार होतं लग्न

SCROLL FOR NEXT