Western Railway News Saam Tv
मुंबई/पुणे

Western Railway News: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; डहाणूकडे जाणाऱ्या लोकल खोळंबल्या

Dahanu Railway Station: रेल्वे प्रशासनाकडून इंजीन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. याचा परिणाम परिणाम लोकलसेवेवर देखील झाला आहे.

Priya More

रुपेश पाटील, पालघर

Virar News: पश्चिम रेल्वेची वाहतूक (Western Railway) विस्कळीत झाली आहे. वैतरणा आणि सफाळे रेल्वे स्थानकादरम्यान पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड (train engine failure ) झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे डहाणूच्या दिशेने जाणाऱ्या लोकल खोळंबल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून इंजीन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. याचा परिणाम परिणाम लोकलसेवेवर देखील झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेची वाहतूक सकाळच्या सुमारास विस्कळीत झाली आहे. वैतरणा आणि सफाळे रेल्वे स्थानकादरम्यान पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाला आहे. विरारवरुन डहाणूच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम लोकलसेवेवर देखील झाला आहे. विरारवरुन डहाणूच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल एकामागे एक थांबल्या आहेत. 10 ते 15 मिनिटांत रेल्वेसेवा पूर्ववत होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलसेवेवर देखील झाला आहे. विरावरुन डहाणूच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. तसंच मुंबईच्या दिशेने याणाऱ्या प्रवाशांचे देखील हाल होत आहे. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे सेवेचा खोळंबा झाल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. अनेक रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. कामावर पोहचण्यासाठी उशिर होणार असल्यामुळे आज अनेकांना लेटमार्क लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Remover: केमिकल प्रोडक्टने मेकअप काढण्यापेक्षा 'या' घरगुती सामग्रीने काढा मेकअप, चेहऱ्याला नाही होणार त्रास

Liver Detox: स्वयंपाकघरातील या पदार्थांनी लिव्हर होईल स्वच्छ, फॅट आणि घाण होईल झटक्यात दूर

Long Hair Tips: लांब आणि सरळ केसांसाठी करा 'हे' ३ सोपे घरगुती उपाय; पार्लरचा हजारो रूपयांचा खर्च वाचेल

Avatar 3: हॉलिवूडचा 'अवतार ३' थिएटरमध्ये पास झाला की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू

SCROLL FOR NEXT