railway News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local News : पश्चिम रेल्वेची वाहतूक पॉवर हेड वायर तुटल्याने विस्कळीत; कामावर निघालेल्या चाकरमान्यांची ट्रॅकवरुन पायपीट

Mumbai News : तीन लोकल या मार्गावर अडकून पडल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बडवे

Mumbai News : पश्चिम रेल्वेच्या दहिसर आणि बोरिवली स्थानकांदरम्यान पॉवरओव्हर हेड वायर तुटल्याने वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. चर्चगेट दिशेने येणाऱ्या फास्ट लाईनवर 10 वाजताच्या दरम्यान ही वायर तुटली आहे. तीन लोकल या मार्गावर अडकून पडल्या आहेत.

यानंतर विरारच्या दिशेने येणाऱ्या इतर लोकल स्लो लाईनवर वळवण्यात आल्या आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवरील वाहतूक 15 ते 20 मिनिट उशाराने सुरु आहे. पीक अवरमध्ये झालेल्या या मोठ्या बिघाडामुळे कामावर निघालेल्या नागरिकांना मोठा मनस्थाप सहन करावा लागत आहे. (Latest Marathi News)

पश्चिम रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 10 वाजून 2 मिनिटांनी हा बिघाड झाला आहे. सकाळच्या वेळी नागरिकांची कामावर जाण्यासाठी लगबग सुरु असते. ऐन गर्दीच्या वेळी पॉवर हेड वायर तुटल्याने मात्र नागरिसांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. (Mumbai News)

या तांत्रिक बिघाडानंतर फास्ट ट्रॅकवर तीन लोकल ट्रेन मागील दीड तासापासून अडकून पडल्या आहेत. त्यामुळे प्रवासी रेल्वे ट्रॅकवरुन पायी चालत पुढील स्टेशन गाठताना दिसले. रेल्वेकडून दुरुस्तीचं काम सुरु करण्यात आलं असून लवकरच सेवा पूर्ववत होईल, असं रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff : १० राऊंड फायर अन् टायगर गंभीर जखमी! अंगावर पट्ट्या बांधलेला पहिला फोटो समोर; प्रकृती चिंताजनक?

Maharashtra News Live Update: चिखलीचे काँग्रेस माजी आ.राहुल बोंद्रे यांना पोलिसांची नोटीस.

भीषण अपघातात ३ तरुणांचा जागीच मृत्यू; नातेवाईकाला सोडून गावी परतताना घडली दुर्घटना

Kanya Pujan : कन्या पूजनाला किती कुमारिकांना पुजायचे? जाणून घ्या

Monday Horoscope : जबाबदाऱ्या वाढतील, ६ राशींच्या व्यक्तींचं नशीब बदलणार; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT