Western Railway Saam TV
मुंबई/पुणे

Western Railway Sixth Line: पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; गर्दी टळणार, वेळ वाचणार!

Western Railway train updates: कांदिवली-बोरीवली दरम्यानच्या जमिनीचे भूसंपदान झाल्याने सहाव्या लाईनच्या कामाला वेग आला आहे. नववर्षात मार्च महिन्यापर्यंत ही मार्गिका सुरु होईल, असे म्हटले जात आहे.

Saam Tv

Western Railway: पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी एक खास बातमी आहे. कांदिवली ते बोरीवली दरम्यानच्या नव्या रेल्वे कॉरिडॉरसाठी खाजगी जागा उपलब्ध झाली आहे. हे महत्त्वपूर्ण भूसंपादन झाल्याने पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय नेटवर्कमध्ये अपग्रेड होणार आहे. हा टप्पा रेल्वेच्या नेटवर्कच्या विस्ताराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

दररोज असंख्य प्रवासी पश्चिम रेल्वेने प्रवास करतात. प्रवाश्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमी प्रयत्न करत असते. गर्दीचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रशासनाने रेल्वे नेटवर्क वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत पश्चिम रेल्वेच्या सहाव्या लाईनचे काम सुरु करण्यात आले. सध्या पाचवी लाईन कार्यरत असून सहाव्या लाईनवर टप्प्याटप्प्याने काम होत आहे.

सहाव्या लाईनसाठी बोरीवलीतील खाजगी जमीन लागणार होती. पण काही कायदेशीर गोष्टींमुळे ट्रॅकचे काम प्रलंबित होते. आता कायदेशीर तरतूदी पूर्ण झाल्या असून बोरीवलीतील ४२४.५ चौरस मीटर जमीन रेल्वे प्रशासनाला मिळाली आहे. या जमिनीवर लाईनचे काम सुरु झाल्यावर मार्च २०२५ पर्यंत सहावी लाईन प्रवासासाठी खुली होईल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्याने माध्यमांना दिली आहे.

रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२३ मध्ये वांद्रे टर्मिनल्स ते गोरेगाव या ९ किलोमीटरचा टप्पा आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये गोरेगाव ते कांदिवला हा ४.५ किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला होता. भूसंपादनामुळे पुढील कामाला सुरुवात होणार आहे. सध्या पूल क्रमांक ६१ चे बांधकाम सुरु आहे. त्या पुलावर प्री-स्ट्रेस काँक्रीट स्लॅब जोडून त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. रेल्वे मार्ग सुरु असल्याने रात्रीच्या वेळेस तेथील जमिनीचे काम केले जात आहे.

पश्चिम रेल्वेची सहावी लाईन सुरु झाल्यास रेल्वेच्या क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. रेल्वेचे नेटवर्क सुधारल्याने मुंबईकरांना अधिक सुखद प्रवास करणे शक्य होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

65 पैकी 63 शाळा बोगस; शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात बडा मासा लागला गळाला, क्राइम ब्रांचची मोठी कारवाई

Medicine Price Drop: बीपी, हार्ट अटॅक आणि डायबेटिस पेशंटला दिलासा; औषधं ४० टक्के स्वस्त, ३९ औषधांच्या किंमती होणार कमी

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरून वाद उफाळला; एसआयटी चौकशीची मागणी

Vietnam Boat Accident: मोठी बातमी! व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटना प्रकरणात मृतांचा आकडा आता पोहोचला चारवर

SCROLL FOR NEXT