Western Railway Disrupted Near Vasai Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: पश्चिम रेल्वे खोळंबली! वसईजवळ ओव्हरहेड वायर तुटली; प्रवासी रूळावरून चालत निघाले, पाहा VIDEO

Western Railway Disrupted Near Vasai: पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. वसईजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकलसेवा खोळंबली. प्रवाशांचे हाल होत असून ते रेल्वे रूळावरून चालत निघाले आहेत.

Priya More

Summary -

  • वसई-नायगावदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली

  • पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत

  • १० ते १५ मिनिटं लोकलसेवा उशिराने सुरू आहेत

  • प्रवासी रुळावरून चालत निघाले

  • ओव्हरहेड वायरच्या दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वसई ते नायगाव रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकलचा खोळंबा झाला आहे. पश्चिम रेल्वेवरील विरार ते चर्चगट दरम्यानची लोकलसेवा १० ते १५ मिनिटं उशिराने सुरू आहे. लोकल उशिराने धावत असल्यामुळे मुंबईच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांचे प्रवाशांचे हाल होत आहे. भाईंदरजवळ लोकल एकामागे एक उभ्या असल्यामुळे प्रवासी रुळावरून चालत निघाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे मार्गावरील भायंदर ते नायगाव रेल्वे स्थानकादरम्या रविवारी सकाळी ७:५२ वाजताच्या सुमारास ओव्हर हेड वायर तुटली. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली. सुरुवातीला दोन लोकल आणि एक मेमू गाडी अडकल्या होत्या. त्यापैकी एक लोकल आणि एक मेमू पुढे काढण्यात आली असून उर्वरित एक ईएमयू गाडी काढण्याचे काम सुरू आहे. दुरुस्तीसाठी टॉवर वॅगन पाठवण्यात आली असून काम पूर्ण होण्यासाठी सुमारे एक तास लागणार आहे. दुरूस्तीचे काम वेगाने सुरू आहे. लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

पश्चिम रेल्वेवरील लोकलची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. लोकल उशिरा धावत असल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. लोकल एकापाठोपाठ थांबल्यामुळे अनेक प्रवासी हे रेल्वे ट्रॅकवरून पायी चालत जात आहेत. आज रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे काही जण घराबाहेर फिरण्यासाठी निघाले आहेत, तर काही कामावर निघालेल्या प्रवाशांचे हाल होत आहे. प्रवाशांची मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT