Crime: वहिनीच्या कामगाराला तलवार घेऊन धमकवायला गेला अन् जीव गमावून बसला! प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Crime: वहिनीच्या कामगाराला तलवार घेऊन धमकवायला गेला अन् जीव गमावून बसला!

डोंबिवलीतील खळबळजनक घटना! माझ्या वहिनीकडे काम करू नकोस असे म्हणत तलवारीने कामगाराला धमकावले; कामगाराने त्याच तलवारीने केली 55 वर्षीय व्यक्तीची हत्या..!

प्रदीप भणगे

डोंबिवली : डोंबिवली पुर्वेकडील खंबाळपाडा परिसरात तलवारीने वार करत एका इसमाची हत्या केल्याची  खळबळजनक घटना घडली आहे. मुकुंद चौधरी असे या मयत इसमाचे नाव असून याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत काल्या उर्फ हीतेश नकवाल याला बेड्या ठोकल्या आहेत.

हे देखील पहा :

आरोपी हितेश खंबाळ पाडा येथे राहणाऱ्या मुकुंद चौधरी यांच्या वहिनी कडे काम करत होता. मुकुंद ने हितेशला माझ्या वहिनी कडे काम करू नकोस असे म्हणत धमकावले होते. काल देखील तर मुकुंद ने रितेशला तलवारीचा धाक दाखवून काम सोडण्याची धमकी दिली होती.

त्यातून  या दोघांमध्ये वाद झाला व हितेश ने मुकुंद च्या  हातातील तलवार हिसकावून मुकुंद वर तलवारीने हल्ला केला या हल्ल्यात मुकुंदचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी टिळक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी अटक करत पुढील तपास सुरू केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात नेसण्यासाठी साडीचे ५ लेटेस्ट ट्रेंडिंग पॅटर्न; प्रत्येक महिलेला उठून दिसतील

Beed Crime: हॉटेलबाहेर ८ ते ९ जणांकडून हल्ला, पोटात चाकू भोसकला; विलास घुले हत्याकांडाचा थरारक VIDEO समोर

Maharashtra News Live Update: जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! या ३ कारणांमुळे पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता रखडला, तुम्हीही ती चूक केलीय का?

५०० कोटींचा घोटाळा, ६० कोटी खात्यात वळवले; बड्या IAS अधिकाऱ्याला CBI कडून अटक, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT