Pune Rain News
Pune Rain News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Rain News: पुण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरूवात; नागरिकांची पळापळ, वातावरणात गारवा

साम टिव्ही ब्युरो

Pune Rain Updates: पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील काही भागांमध्ये जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. शहरातील औंध, बाणेर रोड, सांगवी आणि विद्यापीठ परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची पुरती तारांबळ उडाली असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा झाल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मान्सून लांबणीवर (Monsoon Update) पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दुसरीकडे आठवडाभरापासून राज्यातील तापमानात मोठी वाढ देखील झाल्याचं पाहायला मिळालं आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

अशातच शनिवारपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी (Rain Update) कोसळण्यास सुरूवात झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई, नाशिक, पुणे, रायगड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शनिवारी पावसाच्या सरी कोसळल्या.

पुणे शहरात (Pune News) दुपारनंतर आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. पुण्यातील बाणेर, पाषाण या भागामध्ये सध्या जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत.

अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दुसरीकडे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्याने किरकोळ अपघात देखील झाल्याची माहिती आहे. येत्या दोन ते तीन तासांत पुण्यात पावसाचा जोर अजून वाढणार, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

SCROLL FOR NEXT