IMD Rain Alert in Maharashtra  Saam TV
मुंबई/पुणे

IMD Rain Alert: मुंबई, पुण्यासह अर्ध्या महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Weather Update 12 May 2024: येत्या २४ तासांत मुंबई, पुण्यासह, ठाणे आणि पालघर जिह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Satish Daud

राज्यातील बहुतांश भागात अजूनही उन्हाचा तडाखा कायम आहे. तापमानाचा पारा चाळीशीपार गेल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. एकीकडे प्रचंड उकाडा जाणवत असताना दुसरीकडे काही भागात अवकाळी पावसाच्या सरी देखील कोसळत आहेत. येत्या २४ तासांत मुंबई, पुण्यासह, ठाणे आणि पालघर जिह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रायगड आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज (Rain Alert) वर्तवण्यात आला आहे. सध्या मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये कमालीचा उकाडा जाणवत आहे. दुपारी उन्हाच्या झळा जाणवत असल्याने अनेकांनी घरातच राहणे पसंत केले आहे. अशातच हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवल्यानंतर नागरिकांची उकाड्यापासून सुटका होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात तुफान पाऊस (Heavy Rain) झाला आहे. काही ठिकाणी विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे.

मराठवाड्यातही पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांत तसेच जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. मान्सूनपूर्व पावसाने शेती पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान केलं आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहे.

नाशिक जिल्ह्यातील काही भागालाही अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. दरम्यान, आज आणि उद्या मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या विरुद्ध दिशेने येणारे कोरडे आणि ओलसर वारे यांचा एकत्रित परिणाम होत असल्याने पाऊस कोसळत आहेत, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता

पुढील ४ दिवस मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर नाशिक, संभाजीनगर, जालना, नाशिक, सोलापूर, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, बीड, गडचिरोली, सांगली आणि धाराशिव जिल्ह्याला अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमित शहांच्या दौऱ्यावरून भाजप-काँग्रेस आमने सामने

केसगळती कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल हर्बल हेअर ऑइल, कधी आणि कसं लावायचं? जाणून घ्या

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांनो लक्ष द्या! MACP योजनेचे नियम बदलले; 'या' कर्मचाऱ्यांना आता एक रुपयाही मिळणार नाही

Heart Attack : BP नॉर्मल असतानाही येतो हार्ट अटॅक, 'या' गोष्टीकडे दुर्लक्ष करणे पडते महागात

Farmers Protest : मुगाला १०० टक्के हमीभाव, हजारो शेतकरी आक्रमक; ७ दिवसांचं अन्न-पाणी घेऊन ठिय्या, शाळांना सुट्टी

SCROLL FOR NEXT