Rain Alert in Maharashtra  Saam TV
मुंबई/पुणे

Weather Alert : राज्यात परतीचा पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार; आज पुण्यासह ५ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain News : राज्यात पुन्हा एकदा परतीचा पाऊस सक्रिय होणार आहे. हवामान खात्याने आजपासून अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

Satish Daud

मागील आठवड्यात संपूर्ण राज्यात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यानंतर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली. आता पुन्हा एकदा परतीचा पाऊस सक्रिय होणार आहे. हवामान खात्याने आजपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. आज (ता. १) महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे असलेल्या जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, मध्य प्रदेश आणि परिसरावर असलेल्या वाऱ्यांची स्थिती निवळून गेली आहे. सध्या उत्तर कोकणापासून आग्नेय उत्तर प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप घेतली आहे. परिणामी कमाल आणि किमान तापमान मोठी वाढ होत आहे.

सोमवारी (ता. ३०) अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच राज्यात अनेक भागातील तापमान पुन्हा ३२ अंशांच्या वर गेले आहे. एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना दुसरीकडे राज्यात पुन्हा परतीचा पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.

आजपासून पुढील ४८ तास कोकणातील सिंधुदुर्ग, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे नगर, पुणे, सातारा, बीड, धाराशिव, लातूरमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूर, सांगलीत आज जोरदार पावसाचा अंदाज असून उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. दरम्यान, पुढील काही दिवसही या भागात पावसाची शक्यता आहे.  उर्वरित ढगाळ वातावरण राहणार असून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल; २४k, २२k, १८k सोन्याची प्रति तोळा किती किंमत? वाचा ताजे दर

IPL 2026: 1...2...3 नाही तर तब्बल 11 चेंडू; अर्शदीप सिंगने हद्दच केली, फेकली सर्वात मोठी ओव्हर

Dhurandhar 2 Box Office: बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहचा जलवा; 'धुरंधर २' ची १३ दिवसात १५०० कल्बमध्ये एन्ट्री

Maharashtra Live News Update: अशोक खरातच्या मुलाची काल रात्री चौकशी

Crime News: घरात पतीचा मृतदेह दिसताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; इंजिनिअर जोडप्याच्या मृत्यूनं परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT