Rain Alert in Maharashtra Saam TV
मुंबई/पुणे

Rain Alert: मुंबई-पुण्यासह 'या' भागांना आज मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान? वाचा...

Weather Forecast Today: भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४८ तासांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची (Rain Alert) शक्यता आहे.

Satish Daud

Weather Update 1 March 2024

वेस्टर्न डिस्टबर्न्सच्या प्रभावामुळे देशासह महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल झाला असून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अशातच येत्या ४८ तासांत पुन्हा पावसाची हजेरी दिसून येणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४८ तासांत महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तराखंड आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची (Rain Alert) शक्यता आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होऊ शकते, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी काढणीस आलेली पिके व्यवस्थित झाकून ठेवावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

गेल्या तीन ते चार दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांना गारपीटीने तडाखा दिल्याने रब्बी पिकांसह फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. सरकारने लवकरात लवकर नुकसानीची पाहणी करून मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस

मुंबई तसेच पुण्यासह, मराठवाडा, विदर्भ तसेच खान्देशात पुढील ४८ तासांत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात आज एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद

Maharashtra politics : कोकाटेंचं सेंड ऑफ होणार? अजित पवारांकडून आमदारांसाठी आज स्नेह भोजन

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! इतक्या रुपयांची फक्त एकदाच गुंतवणूक करा अन् दर महिन्याला मिळवा २०,००० रुपये

Success Story: MBBS केलं, नंतर पहिल्याच प्रयत्नात USPC क्रॅक; IPS अधिकाऱ्याची लेक झाली IAS; सौम्या झा यांचा प्रेरणादायी प्रवास

Mangal Gochar: काही तासांनंतर मंगळ करणार बुधाच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर होणार सकारात्मक प्रभाव

SCROLL FOR NEXT