सुशात सावंत, मुंबई
मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची मागणी करत महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. तसेच सरकारच्या चहापानाला जाणार नाही असंही ते म्हणाले. ("We will expose this anti-democratic government" - Devendra Fadnavis)
हे देखील पहा -
फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बैठक झाली, या अधिवेशनात कोणते विषय मांडायचे यावर चर्चा झाली. देशाच्या इतिहासात जे घडलं नाही ते राज्यात पहायला मिळत आहे. दाऊद इब्राहिमचे सहकारी यांच्यासोबत व्यवहार करून जेलमध्ये मंत्री गेले, नवाब मलिक यांना वाचायला सरकार उभं राहिलं आहे असा टोला त्यांनी सरकारला लगावला, तसेच देशात असं कधी कधीच घडलं नाही असं म्हणत पोलीस कोठडीत गेल्यानंतरही मंत्री पदावर कायम आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.
मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे -
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा घेतला पाहिजे, यासाठी आम्ही सभागृहात संघर्ष करू. आम्हाला चर्चा करायला इंटरेस्ट आहे, राज्यातील जनतेचे प्रश्न मांडले गेले पाहिजे, चर्चा झाली पाहीजे हे आमचे मत आहे. 12 आमदारांना यांनी मागे निलंबित केले, पण यावेळी तशी तानाशाही केली तर आम्हाला विचार करायला लागेल असा इशाराही फडणवीसांनी सरकारला दिला आहे.
अजित पवारांच्या शब्दला किंमत नाही -
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत फडणवीस म्हणाले की, उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला किंमत राहिली नाही. अजित पवार म्हणाले वीज कनेक्शन कापले जाणार नाही, पण आता कनेक्शन कापले जात आहे, यांना आता आम्ही जाब विचारणार आहोत, हे सावकारी सरकार आहे. आज उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे, गाळप न झालेल्या उसाचा एक मोठा प्रश्न उभा राहत आहे, सरकारने पैसे दिले पाहिजे असं फडणवीस म्हणाले.
आरक्षण -
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाबाबत फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हे दोन्ही विषय आहेत. छत्रपती घराण्यातल्या लोकांना आज उपोषणाला बसावे लागत आहे हे, याच सरकारमध्ये झालंय. ओबीसींच्या शिष्यवृत्तीचे पैसेही दिले जात नाही. ओबीसींवर या सरकारचा इतका राग का आहे? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केलाय.
सरकारच्या चहापानवर जाणार नाही -
महाज्योतीला पैसे मिळत नाही तोवर आमचा संघर्ष सुरू राहील, परिक्षांचे घोटाळे अजून संपलेले नाही, भ्रष्टाचारी सरकार असे नाव या सरकारचे लिहिले जाईल. सरकार पूर्णपणे फेल झालेले आहे. बेबड्यांना समर्पित असे हे सरकार आहे. या सरकारच्या विरोधात आम्ही मोठा एल्गार पुकारणार आहोत, या सरकारला एक्सपोज करू, लोकशाहीच्या विरोधी हे सरकार आहे आम्ही सरकारच्या चहापानवर जाणार नाही अशी भुमिक फडणवीसांनी स्पष्ट केली आहे.
जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे -
"नवाब मलिक यांचा राजीनामा न घेऊन एका विशिष्ट समाजला सिग्नल देण्याचा प्रयत्न आहे" असा आरोप फडणवीसांनी केलाय. तसेच "यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे" अशी टिका त्यांना छगन भुजबळ यांच्यावर केली आहे. त्याचप्रमाणे आमच्या नेत्यांना त्यांनी दोन वर्षे टार्गेट केले आहे. नारायण राणे, नितेश राणे, प्रवीण दरेकर यांना त्रास देण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे. हे कांगावा खोर सरकार आहे. हे म्हणतात महाराष्ट्र झुकणारा नाही, पण यांच्यासारख्या अहकाऱ्यांना झुकवणार असंही फडणवीस म्हणाले.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.