Kondhwa News Today, Kondhwa Accident Today, Kondhwa News Today Marathi
Kondhwa News Today, Kondhwa Accident Today, Kondhwa News Today Marathi Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : कोंढव्यात वाड्याची भिंत घरांवर कोसळली; ११ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे: कोंढवा बुद्रुक (Kondhwa Budruk) गावठाणात एका वाड्याची भिंत गुरुवारी सकाळी शेजारील घरांवर कोसळली. (Wall Collapse) सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोचून तीन घरांमधील ११ जणांची सुटका केली. (Kondhwa News Today)

हे देखील पाहा -

कोंढवा बुद्रुक गावठाणामधील दत्त मंदिरासमोर एक वाडा आहे. वाड्याशेजारीच नागरिकांची घरे आहेत. जोरदार पावसामुळे गुरुवारी पहाटेच्या सुमारास संबंधित वाड्याची भिंत बाजूच्या तीन घरावर पडली. दरम्यान, या घटनेची माहिती नागरिकांनी अग्निशामक दलाला दिली. त्यांनतर काही वेळातच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दगड, माती व चिखल बाजूला काढून आतमध्ये अडकलेल्या ६ रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. (Kondhwa News Today Marathi)

"जुना वाडा अतिशय जीर्ण आहे आणि सर्व रहिवासी आता बाहेर पडले आहेत. या वाड्याची भिंत शेजारी असलेल्या तीन लहान घरांवर पडली,” असे अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत स्थानिक नागरिकांनी पाच जणांना वाचवले होते. अग्निशमन दलाने सहा जणांची सुटका केली, असे एकुण ११ जणांना वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान मागील आठवडाभरापासून राज्यातील (Maharashtra) विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच पुढचे 48 तास राज्यासाठी अतिमहत्वाचे आहे. कारण पुढच्या 48 तासांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Kondhwa News Today Marathi)

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yamaha च्या या स्कूटरमध्ये मिळेल 21 लीटर अंडरसीट स्टोरेज, 49 Kmpl मायलेज; जाणून घ्या किंमत

Upcoming Bikes: मार्केट होणार जाम! जूनमध्ये लॉन्च होणार Royal Enfield Guerrilla 450; किती असेल किंमत?

24GB RAM आणि 50MP कॅमेरा असलेल्या फोनवर मिळत आहे 23,000 रुपयांची सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर

GT vs KKR : गुजरातचं प्लेऑफचं स्वप्न पावसात गेलं वाहून; GT vs KKR सामना एकही चेंडू न टाकता रद्द

Sushil Kumar Modi: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT